Homeसंपादकीयराज्यकर्त्यांनो हरामी पणा करू नका ज्यांच्या मुळे जीडीपी वाढला होता त्यांच्या डीपीच...

राज्यकर्त्यांनो हरामी पणा करू नका ज्यांच्या मुळे जीडीपी वाढला होता त्यांच्या डीपीच कनेक्शन तोडू नका

गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश बंद होता देशातील सर्व उद्योग व्यापार व्यवसाय ठप्प झालेले असताना देश प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला असताना फक्त आणि फक्त माझ्या बापाचा उद्योग म्हणजे शेती हा शेतीचा कारखाना अखंडितपणे चालू होता या शेती उद्योगाने देशाचा जी डी पी सावरलेला होतास सावरलेला आहे हे विसरता कामा नये मात्र या नमक हराम राज्यकर्त्यांनी शेतकरी आणि शेतीला दुय्यम स्थान दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायांना साखर कारखान्यांना पुनर्जीवन देण्यासाठी कारखान्यांचे कर्ज माफ करण्यात आले मुबलक प्रमाणात वीजपुरवठा करण्यात आला मात्र सतत तोट्यात असणारा जीवाला घोर लावणारा भाकरीच झाड लावणारा शेतकरी व शेती व्यवसाय दुर्लक्षित करून शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आला सरकार कोणाचेही असो अन्याय फक्त शेतकऱ्यावर होतो हे नवीन नाही फक्त निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू दिवसा चांगल्या प्रकारे वीज देऊ त्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगणारे हे राजकारणी लोक निवडून आल्यानंतर ऐन तोंडी आलेला घास हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत आता कुठे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानातुन शेतकरी सावरून रब्बीचा तयारी करत आहे काही शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या करून टाकल्या आहेत त्या कोंब आलेल्या जमिनी पाण्यासाठी गुंतून पडलेले आहेत दोन-तीन दिवसात पाणी मिळाले नाही तर ते कोंब जळून जातील व शेतकऱ्याचं अधिकच नुकसान होईल त्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे पाणी देण्यासाठी लागणारा साधन इलेक्ट्रिक मोटार डीपी वरचे कनेक्शन कट केल्याने बंद आहे शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये असताना हे गेंड्याच्या जातीच सरकार निवडणुकीच्या तयारीत मध्ये गुंतलेले आहे वीज कट करण्याचा फरमान सोडून सरकारने अतिशय किळसवाणा प्रकार सुरू केले आहे विद्युत कायदा 2003 कलम 56 प्रमाणे शेतकऱ्यांना नोटीस काढून त्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्यात येत आहे आता शेतीसाठी अतिशय संवेदनशील काळ असून दोन चार दिवसांमध्ये शेतीला पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे कर्जबाजारी झालेला शेतकरी रब्बीच उत्पन्न घेऊन थोडाफार सावरला असता मात्र तेही या सरकारातील लोकांना सहन झालं नाही हे शेतकरी विरोधी आहेत होते आणि राहतील जर आता यांनी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले नाही तर शेतकरी त्यांना हजार होल्टेज चा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही..

http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/
                      -  संतोष पाटील 
                   7666447112
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular