परिपूर्ण पुरुष कुणाला कळला का ओ…?? कर्तृत्व, वक्तृत्व, अभ्यासू, जिद्द, चिकाटी, खरेपणा, स्पष्टवक्तेपणा, महत्वाकांक्षी, ध्येयवादी,पराक्रमी, लोकप्रिय, धुरंधर, कर्तव्यदक्ष अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या पुरुषास “परिपूर्ण पुरुष” म्हणतात…!! आणि या परिपूर्ण पुरुषास राज ठाकरे म्हणतात..!!
१४ जून १९६८ रोजी मधुवंती श्रीकांत ठाकरे यांच्या पोटी दादर मुंबई येथे जन्माला आलेल्या या मुलाचं नाव त्यावेळी स्वराज श्रीकांत ठाकरे ठेवण्यात आलं होतं… हरहुन्नरी, चतुरस्त्र, थोडंसं गंमती जमती करणं हे गुण लहानपणी आणि शालेय जीवनात अनुभवायला मिळाले…. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यात जन्माला आलेल्या या मुलाला लहानपणापासूनच राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे गिरवायला मिळाले…!!
राज ते राजसाहेब हा प्रवास तितकासा सोपा नव्हता…!! बाळासाहेबांच्या संस्कारांचे खरे वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते उगीच नाही… त्यासाठी राज ठाकरेंनी शिवसेना आणि शिवसेना अंगीकृत विद्यार्थी सेना वाढविण्यासाठी अनेकदा लाट्या काठ्या सोसल्यात.. अनेकदा पोलीस केसेस दाखल झाल्यात… शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यात राज ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे…!! बाळासाहेबांच्या अनेक सभांचे, आणि दौऱ्यांचे साक्षीदार राज ठाकरे आहेत….!! अनेक आंदोलनातून आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढ्यातून त्यांनी स्वतःचं अस्तित्व आणि नेतृत्व सिद्ध केलंय..!! बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेणारा खरा वारसदार म्हणून धर्मवीर आनंद दिघे ह्यांनी ज्यांच्याकडे पाहिलं ते राज ठाकरे … पुढे जावून शिवसेनेची सर्व सूत्र ह्यांच्याकडे जातील की काय या अनामिक भीतीने काही जणांना पोठशुळ उठू लागले आणि म्हणूनच त्यांना हेतुपुरस्सर बाजूला ठेवून त्यांची हेळसांड करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला…!! आणि म्हणूनच नाईलाजाने राज ठाकरेंनी शिवसेनेला राम राम ठोकला आणि ते तिथून स्वाभिमानाने बाहेर पडले…!! फोडाफोडीचे राजकारण न करता त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एकला चलोरे प्रवास सुरू केला…!!
जगाला हेवा वाटावा असा “महाराष्ट्र” निर्माण करण्याचा मानस उराशी बाळगून ९ मार्च २००६ रोजी “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” हा पक्ष स्थापन केला…!! महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी मनसेच्या वतीने अनेक आंदोलने केली.. महाराष्ट्रातील तरुण तरुणींना स्थानिक नोकरीत प्रथम प्राधान्य देण्यात यावं.. अनेक परीक्षा ह्या हेतुपुरस्सर इंग्रजी भाषेत घेतल्या जात होत्या त्या मराठीत घेण्याचा आग्रह हा मनसेच्या वतीने घेण्यात आला…!! माझ्या महाराष्ट्रातील तरुण पिढी सुदृढ व सक्षम झाली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रगती होईल हा ध्यास राज ठाकरेंनी घेतला…!! आणि या अशा विचारांनी प्रेरित होऊन राज साहेबांची भाषणे ऐकून अनेक मनसैनिक माता भगिनी राज ठाकरेंना जोडले गेले….!!
राज ठाकरे हे उत्कृष्ट व्यंग चित्रकार आहेत.. जगप्रसिध्द व्यंगचित्रकार वॉल्ट डिस्ने यांना ते या क्षेत्रातील आदर्श मानतात…!! जर राजकारणात आलो नसतो तर कदाचित मी जगविख्यात व्यंगचित्रकार म्हणून नाव कमावलं असतं.. आर्ट गॅलरी व आर्ट इन्स्टिट्युट उभारली असती…. पण मी राजकारणात आलो… का तर जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र निर्माण करून दाखवण्याचं माझं स्वप्न आहे…!! पैसे कमावण्यासठी मी मुळीच राजकारणात आलो नाही… मला माझ्या महराष्ट्रातील युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून द्यायचे आहेत.. मला मोठ मोठे प्रकल्प माझ्या महाराष्ट्रात आणायचे आहेत… गल्लीच्छ आणि जातीयवादी राजकारण संपवायचं आहे…!! सर्वार्थाने सुजलाम सुफलाम महाराष्ट्र निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे…!!! माझे मनसैनिक हे स्वतः राज ठाकरे आहेत…माझा मनसैनिक हेच माझं बळ आहे…!! माझा मनसैनिक कुणावर कधीच अन्याय करणार नाही आणि अन्याय करणाऱ्याला अद्दल घडविल्याशिवाय गप्प बसणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे…!! स्वतःचा व्यवसाय, नोकरी घरदार सोडून पक्षासाठी काम करणारा मनसैनिक मला नकोय.. त्यानं आधी स्वतःचं कुटुंब पाहिलं पाहिजे आणि मग उरलेला वेळ काढून त्याने महाराष्ट्र हितासाठी पक्षाला वेळ दिला पाहिजे…!! मनसेची यशस्वी आंदोलनं सामान्य माणसापर्यंत मनसैनिकानी पोचवली पाहिजे… पहिलं प्राधान्य मनसैनिक मग इतर सहकारी असं मानणारे राज ठाकरे कुठे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा निव्वळ वापर करून घेणारे इतर पक्षाचे नेते कुठे….??????
मला माझ्या राजसाहेबांबद्दल म्हणूनच अभिमान आहे… कारण “छत्रपती शिवाजी महाराज की” असं म्हंटल्यावर ज्याच्या तोंडून आपसूक “जय” येतं तो मराठी अशी त्यांनी शिकवून दिली ते “राजसाहेब..”
निव्वळ हिंदुत्व हिंदुत्व शंखनाद न करता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा मशिदींवरील बेकायदेशीर भोंगा उतरवण्याच्या निर्णयाला कृतीतून दाखवून देतात ते “राजसाहेब..”
मी हे कधी बोललोच नाही अशी पलटी न मारणाऱ्या बाळासाहेबांच्या संस्कारांचे खरे वारसदार म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर सारा देश पाहतो ते “राजसाहेब..”
टीकाकारांची तमा न बाळगता कुणी निंदा अगर वंदा महाराष्ट्र नवनिर्माण करण्यासाठी व्यापक विचार आणि अभ्यासू दूरदृष्टी ज्यांच्याकडे आहे ते “राजसाहेब”
नेटच्या या जगात सर्वात जास्त गुगलवर ज्या राजकीय नेत्याला सर्च केलं जातं त्या सर्व्हरमध्ये जे अव्वल स्थानी आहेत ते “राजसाहेब”
महामानवाच्या निंदा नालस्ती करू नका विकासाचा विचार करून राजकारण करा असा इतर पक्षांना जे खडसावून सांगतात ते “राजसाहेब”
शिवरायांच्या विचारांचे वारसदार म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण देशात पाहिलं जातं.. निव्वळ राजकारणासाठी शिवरायांचा उपयोग करू नका असं ठणकावून जे सांगतात ते “राजसाहेब”…
ज्यांच्या भाषणाला लाखोंची गर्दी होते… आणि ते कुणा कुणाची खरडपट्टी करणार आहेत याची उत्सुकता ज्यांच्या भाषणापूर्वी लागते ते राजसाहेब…!!
असं सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे.. ज्यांच्याकडे व्हिजन आहे.. भ्रष्टाचार गाढण्याची क्षमता आहे.. असं व्यक्तिमत्व म्हणजेच “राजसाहेब”
असा माझा विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीत, महाराणी ताराराणीच्या करवीर नगरीत, ज्यांनी देशाला सर्वप्रथम समतेचा संदेश दिला त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत आणि साडे तीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजेच करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या करवीर नगरीत मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी आगमन होत आहे….!! त्यांचं आपण सर्वांनी उत्साहात जल्लोषात स्वागत करूया… त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एकदिलाने त्यांना अर्थातच माझ्या राजसाहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सच्चा “मनसैनिक” म्हणून प्रयत्न करूया….!!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेप्रमुख, मराठी मनाचा मानबिंदू, हिंदुजननायक, बाळासाहेबांच्या संस्कारांचे खरे वारसदार, शिवरायांच्या विचारांचे वारसदार माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आपल्या करवीर नगरीत अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो… आणि रजा घेतो..!!
लेखक -: पत्रकार सुनील सामंत कोल्हापूर
मुख्यसंपादक