रावण

वर्षानुवर्षे भव्य त्या रावणाच्या पुतळ्याला जाळूनिया असत्यावर सत्याचा मात करूनिया परतले

महादेवाच्या परमभक्ताला असे जळताना पाहून अंग शहारून गेले

फक्त सितेला उचलून घेऊनिया गेले म्हणून रावण कित्येक वर्षानुवर्षे जळत राहिले

सीतेच्या इच्छेविरुध्द तिला स्पर्श न करणारा रावण माझ्या नजरेत मात्र महान ठरले

नियतीपुढे कुणाचे काय चालते, प्रभू रामचंद्रांकडून मरण यावे म्हणूनच बहुधा हे पाप रावणाकडून घडले

रावणास मारण्यास विष्णू ने ही मर्यादा पुरुषोत्तमपुरुष रामाचे अवतार घेऊनी जन्मले

स्वत:ला प्रश्न विचारून पाहिले
माझ्यात सामर्थ्य आहे का तेवढे ?

प्रश्न विचारले स्वत:शीच
परस्त्रीकडे बघून नजर धोका का देते ?

स्वत:च्या स्वार्थासाठी दुःख देताना का हात थरथरत नाहीत माझे ?

नव्हे मी मर्यादापुरुषोत्तम राम, तर मी का दहन करावे रावणाच्या पुतळ्यास

करायचे असेल तर दहन करावे
मी माझ्यातल्यास रावणास

मी माझ्यातल्या रावणास

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular