शहर ते खेडं प्रवासात या
लालपरी घेऊन फिरतो
प्रवाशांच्या सेवेसाठी
ब्रीद आम्ही जपतो
विद्यार्थी ते जेष्ठ नागरिक
प्रवासी हा नवा रोजचा
दिनरात मेहनत करून
भरतो आम्ही गल्ला तुमचा
रोज फिरवितो स्टेरिंग
नी फाडतो तिकीट
तुटपुंज्या पगारावर
रिकामं खिशातलं पाकिट
हात दाखवा गाडी थांबवा
करतो प्रमाणिक काम
कष्टाला आमच्या मात्र
मिळेना योग्य दाम
आयुष्य जगण्याच्या आज
सापडेना विविध क्ल्युप्त्या
तुटपुंज्या पगाराला कंटाळून
कर्मचारी करताय आत्महत्या
मागणी विचारात घेऊन
न्याय द्यावा रास्त
लालपरीची वाट बघून
प्रवासी झालेत त्रस्त..!
चित्र – आभार नेट
संदीप देविदास पगारे
खानगाव थडी,नांदूर मधमेश्वर-नाशिक
मुख्यसंपादक