Homeमुक्त- व्यासपीठलाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त

लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त

जय जवान जय किसान
तो देश हिताचा नारा होता
दिन,दुबळ्यांचा कैवारी
बहूजन हिताचा होता ज्ञाता….

एक आदर्श समाज
उद्धारकर्ता असा होता तो
सर्वांचा लाडका नेता…

गरीबीत जगला,पण
गरीबीला जागला
शरीरानं लहान पण
मनानं होता महान….

नावासारखाच होता बहाद्दूर
होता लढवय्या होता तो शूर
दूष्काळात गरीबांचा
होता दानशूर….

ज्याच्या योगदानाचे
घुमला स्वातंत्र्याचा सुर
आवळून मुसक्या शत्रूच्या
पसरली ज्याची ख्याती सर्वदूर
असा होता तो लाल बहाद्दूर….

शत: शत: नमन


-सौ.भाग्यश्री आपेगांवकर
ता.अंबेजोगाई
जि.बीड

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular