Homeमुक्त- व्यासपीठलास्ट सीन ****

लास्ट सीन ****

   पहाटेच्या कोवळ्या रंगानी न्हाऊन निघालेली सोनसकाळ .... ती उठली .... रोज सकाळी उठल्या उठल्या पहिले घड्याळ बघून देवाला नमस्कार करणारी ती .... पण गेले दोन दिवस उठल्यावर उत्स्फूर्तपणे आधी मोबाईल बघते .... आणि पुढच्या क्षणी हिरमुसली होते .... आजही तेच .... उठून पटापट सगळी काम उरकली, सासूला चहा दिला .... तेव्हा सासूने विचारले देखील, चेहरा का उतरला म्हणून .... ती काहीच बोलली नाही .... सगळं यंत्रवत सुरु होत .... तिने ऑफिसची तयारी केली, आणि निघूनही गेली .... पण नेहमीचा उत्साह नव्हता .... तीच काहीतरी बिनसलय हे सासूला कळत होत .... अवघ्या चार महिन्यांपूर्वी ती सून म्हणून घरात आली होती .... सगळं घर आनंदी होत .... 
   ती ऑफिसला गेल्यावर सासू विचार करत होती .... काय बिघडलय याचा साधारण अंदाज होता त्यांना .... एकतर त्यांचं नवीन लग्न झालेलं .... आणि त्यात त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामासाठी आठ दिवस परगावी होता .... म्हणूनच ती बेचैन असावी असा त्यांचा अंदाज होता ... 

   संध्याकाळी ती ऑफिसमधून परत आली .... सासूने मस्त चहा करून दिला .... दोघी एकत्रच चहा घेत होत्या .... सासूच लक्ष तिच्याकडेच होत .... ती शांत दिसत असली तरी अस्वस्थ होती .... अचानक तिने सासूला विचारले , त्याचा फोन वगैरे आला होता का ? .... 'नाही ग, का तुला नाही का आला?' .... तिने मानेनेच नाही म्हटले, पण डोळ्यात पाणी तरळत होत .... अखेर सासूने तिला विचारलेच, काय झालंय .... काही नाही गेल्या तीन दिवसांपासून त्याच्याशी काही बोलणं झालेलं नाही .... फोन नाही, मेसेज पण नाही .... अगं काही अडचण असेल, कामात बिझी असेल, नसेल वेळ मिळाला त्याला .... हो पण .... डोळ्यातून नकळत अश्रू टिपला तिने .... फोन नाही, मेसेज नाही, ठीक आहे, पण त्याच " लास्ट सीन " सुद्धा दिसत नाहीये .... त्या शब्दांनी सासूही कावरीबावरी झाली .... आई, बोलला नाही तरी हरकत नाही पण निदान लास्ट सीन तरी दिसावं ना .... ते दिसलं तरी बर वाटत .... म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही .... अग नको काळजी करुस .... सासू तिला समजावत होती .... आणि एकदम तिचा फोन वाजला .... त्याचाच फोन .... ती खुलली .... सासूही हसली .... आता बोल त्याच्याशी आणि ओरड त्याला .... डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन ती त्याच्याशी बोलायला लागली .....

   खरंच, हल्लीच्या या सोशल मीडियाच्या आधुनिक युगात हा " लास्ट सीन " बरच काही देऊन जातो .... मानसिक समाधान .... अंतर्मनाची जाणीव .... आपलं माणूस लांब असलं, बोलत नसलं, तरी त्याच " लास्ट सीन" सांगत असत की , आपलं माणूस अगदी सुखरूप आहे .... पण तोच लास्ट सीन दिसला नाही तर .... मन सैरभैर होत .... मग नको ते विचार .. काळजी ... चिंता .... हे " लास्ट सीन " आयुष्याचा अविभाज्य भाग झालंय आता .... त्यांच्यामुळे आपलं माणूस निदान आपल्या मनाजवळ असल्याचं समाधान .... 

” लास्ट सीन ” जादूचे शब्द …..

http://linkmarathi.com/%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular