Homeमुक्त- व्यासपीठलोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त

लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त

समाजाचा सर्वांगिण विकास घडवून आणायचा असेल तर शोषितांना समान न्याय व दर्जा मिळणे आवश्यक आहे हे जाणणारे, दुरदृष्टीकोन ठेवून लोकशाहीला प्रेरक आणि पोषक असा राज्यकारभार चालविणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार व कृतीचे अनुकरण आजही महत्त्वाचे आहे – मनोज गावनेर
अस्पृश्यता, कुप्रथा, जातिभेद नष्ट करण्यासाठी कठोर कायदा करून समाज उत्थानासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे सक्तिचे शिक्षण केले, मागासवर्गीयांना आरक्षण लागू करुन व विधवा पुनर्विवाहाला कायदेशिर मान्यता देऊन स्त्रियांना शिक्षणाची सोय करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले. जातिभेद समूळ नष्ट व्हावा यासाठी आंतरजातिय विवाह घडवून आणले. याची सुरुवात स्वतःच्या घरापासून म्हणजे त्यांच्या बहिणीचे लग्न धनगर समाजातिल यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले आणि १०० मराठा धनगर आंतरजातीय विवाह घडवून आणले. तत्कालिन वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था प्रस्थापित सवर्णांना न जुमानता कायदा करून प्रतिबंधित केले आणि सर्वांना समान न्याय मिळवून दिला.
यांच्याच सहकार्यामुळे जगाला डॉ. आंबेडकरांसारखे महामानव मिळाले. ज्यावेळी संपूर्ण जगात प्लेगचे थैमान होते त्यावेळी ही साथ भारतातही पसरली होती. पण महाराजांनी त्यावेळी उपलब्ध मर्यादित साधनसामग्री व माहिती याच्या आधारावर त्यांच्या उपाययोजना अतिशय महत्त्वाच्या आणि अणुकरणीय आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचा वसा पुढे चालविला आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशिल राहिले. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडून खुप काही शिकण्याजोगे व अनुकरणीय आहे. पण अशा महान राजांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत का पोहचू शकले नाही याचा शोध घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घराघरात पोहचविणे आवश्यक आहे.
अशा या बहुजनांच्या कैवारी, समाजक्रांतिकारक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शाहु महाराजांनी आपल्या राज्यात खऱ्या अर्थाने सर्वांना समान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजनैतिक न्याय मिळवून दिला. म्हणून त्यांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते.
#छत्रपतिशाहुमहाराज #राजर्षीशाहुमहाराज #ShahuMaharaj

सामाजिकन्यायदिन

*_- मनोज गावनेर_*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular