वनवास

पेटत्या निखाऱ्यावर
चालणारे
ते पाय कुणाचे होते ? …

जाणाऱ्या त्या चातकाचे
श्वास मोजणारे कोण
होते ?…

रस्तात सारे चेहरे नवेच
होते
दोन श्वास जीवनाचे दिशा
ठरवणारे कोण होते? …

दिस तुझे वनवासाचे
निखाऱ्यात भाजलेले
संकटात सोबतीला तुझ्या
कुठे कोण होते..?

सौ. भाग्यश्री एम शिंदे (मोरे )
आपेगाव (बीड )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular