Homeघडामोडी"वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर" या संस्थेचा आज प्रथम वर्धापनदिन

“वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर” या संस्थेचा आज प्रथम वर्धापनदिन

वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूर प्रथम वर्धापनदिन

सर्वांना नमस्कार,

“वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर” या संस्थेचा आज प्रथम वर्धापनदिन

  या आपल्या संस्थेच्या वतीने निसर्ग संवर्धन, पशुपक्ष्यांचे जतन व निसर्गातील प्रत्येक घटक वाचविण्यासाठी प्रयत्न, तसेच अनेक सामाजिक उपक्रम आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबवत आहोत.

  गेल्यावर्षी ११ मे २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व निसर्गमित्रांची फौज बांधून गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र बरेच निसर्गोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

  गेल्यावर्षीच्या सुरुवातीला मार्च २०२१ मध्ये संस्थेच्या वतीने "सेल्फी विथ वॉटर फॉर बर्डस अँड ऍनिमल्स" हा उपक्रम राबविला गेला. या उपक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशाबाहेरून दोहा कतार व फिलिपाईन्स या देशातून प्रतिसाद मिळाला. या वर्षीच्या कडक व तीव्र उन्हाळ्यात या उपक्रमामुळे हजारो लोकांनी आपल्या घरात, अंगणात व आपल्या परिसरात मुक्या पक्ष्यांसाठी व प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. या उपक्रमाला सर्व स्तरातून आबालवृद्धांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ऐन उन्हाळ्यात घेतलेल्या या उपक्रमामुळे कित्येक मुक्या जीवांची पाण्यावाचून होणारी तडफड थांबली.

   बीज संकलन मोहीमेअंतर्गत जवळपास २५ हजार देशी वृक्षांच्या बिया संकलित करण्यात आल्या व त्या सर्व बिया पुण्यात लालाजी माने सरांच्याकडे रोपनिर्मितीसाठी पाठवण्यात आल्या. तसेच जून महिन्यात आंबा, जांभूळ, चिंच व फणस या फळबीयांच्या पासून घरच्या घरी रोपनिर्मिती कशी करावी हा उपक्रम घेण्यात आला.

 गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्यांना गणेशभक्तांना जवळपास ३०० औषधी रोपे वाटप वाटप करण्यात आलीत जेणेकरून प्रत्येकाने या उपक्रमाची प्रेरणा घेऊन दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

   गेल्यावर्षी निसर्गपूरक रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी बीजराखीचा उपक्रम पूर्ण कोल्हापूर जिल्हयात राबविण्यात आला. यासाठी वेगवेगळ्या देशी बिया तसेच, फळझाडांच्या व वेलींच्या बिया वापरून तयार केलेले ५०० बीजराखी किट हे सर्वांना मोफत वाटप केले गेले. त्यापासून बीजराखी करून लोकांनी या राख्यापासून रोपे तयार केली आहेत. या निसर्गपूरक उपक्रमाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम राबविण्यासाठी वर्षा वायचळ मॅडम व परीतोष उरकुडे, अमोल गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

   'माझी चिऊताई अभियान' या उपक्रमाअंतर्गत चिमण्यांचा अधिवास वाढण्यासाठी १४ शाळांमध्ये जवळपास १००० विद्यार्थ्यांना टाकाऊ पदार्थापासून, वस्तूपासून चिमणीची घरटी कशी करावीत याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच गेल्याच महिन्यात कलेतून निसर्ग संवर्धनाकडे या concept मधून अमूज क्राफ्टच्या सहाय्याने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या अभियानातून चिमण्यांचे रक्षण करण्याचा उद्देशात नक्कीच मोठा फरक पडला आहे.

  यासोबतच बरेचशे वन्यप्राणी rescue, नायलॉन मांजाचा गैरवापर, पोल्ट्रीच्या मृत कोंबड्यांची विल्हेवाट अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी वनविभाग व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सोडविण्यात आल्यात.

 हे सर्व उपक्रम राबविताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे सर, संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. शरद चव्हाण, निसर्गमित्र निलेश साळुंखे, लालाजी माने सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले. गेल्यावर्षी ११ मे पासून ते आजपर्यंत वर्षभरात सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविल्या बद्दल 'वर्ल्ड फॉर नेचर,कोल्हापूरच्या सर्व सभासदांचे व निसर्गमित्रांचे अभिनंदन. 

तसेच वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

 या संस्थेच्या माध्यमातून आपणा सर्वांना एका चांगल्या व हक्काच्या प्लॅटफॉर्मवर निसर्गसेवेची, प्राणीसेवेची, निसर्ग संवर्धनाची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. निसर्गाच संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणी यासाठी आपण येथून पुढेही सर्वांनी मिळून एकजुटीनेने काम करुया. 

  • टिम “वर्ल्ड फॉर नेचर” कोल्हापूर जिल्हा
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular