आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे कारण माणसाच्या प्रगतीची आणि भवितव्याची दिशा ही वेळच ठरवत असते . आपल्या हातातून गेलेला पैसा आपण परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ कधी परत नाही आणू शकत; कारण जसे बाणातून सुटलेला तिर कधी माघारी फिरू शकत नाही , ना त्याला आपण थांबवू शकत तसेच हातातून निघून गेलेली वेळ कधी परत येत नाही.
तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही बनायचं असेल किंवा काही वेगळं करायचं असेल तर वेळेला महत्व द्या .
जेव्हा तुम्ही वेळेला महत्त्व द्याल तेव्हा तुमची वेळ येईल जर वेळेकडे दुर्लक्ष कराल तर वेळ ही तुमच्याकडे दुर्लक्ष करेल जो व्यक्ती वेळेनुसार चालतो तो कधी मागे राहत नाही…वेळ हा आपला असा गुरू आहे जो तुम्हाला घडवण्यासाठी स्वतः खर्च होतो आणि जेव्हा तुम्ही
त्याला महत्व द्यायचं बंद कराल तेव्हा तो तुमची साथ सोडून पुढे निघून जाईल
जेव्हा माणूस बदलतो तेव्हा वेळ तशीच असते पण जेव्हा वेळ बदलते तेव्हा माणसाचं होत्याच न्हवत होत म्हणून वेळेसोबत चाला वेळेनुसार माणूस बदलतो आणि वेळेनुसार माणूस बदलला तर माणसाची जीवन शैली बदलते.
वेळेत ऐवढि ताकद आहे की ती माणसाचं अस्तित्व बदलुन टाकू शकते ….म्हणून वेळेला महत्व द्या. म्हणूनच कोणी तरी लिहून ठेवलय time is money
- तुकाराम गुरव ( आजरा )
मुख्यसंपादक
खूप छान….