Homeकृषीशेततळे नियोजन सल्ला

शेततळे नियोजन सल्ला

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. शक्‍यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात, त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरासाठी प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी. शेततळी ही काळ्या खोल जमिनीत बांधली गेली असतील तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहते; शेततळ्यात गाळ राहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते. शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जल संधारणाचे उपाय करावेत. त्यामुळे पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्ड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पानांमुळे गाळणी होईल. इनलेट व आउटलेट (प्रवेशद्वार व निर्गमद्वार) प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मीटर अंतरावर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचा सिल्ट ट्रॅपचे (गाळ साठणारी जागा) खोदकाम करावे. शेततळ्याच्या दोन्ही द्वारांजवळ दोन मीटर लांबीपर्यंत दगडाची पिचिंग करावी. शेततळ्याला काटेरी तार किंवा लाकडाचे कुंपण करावे. जेणेकरून जनावरांचा त्रास होणार नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular