श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दयाघन,
भक्तवत्सल माऊली.
दत्तराज स्वामी करूणाकर ,
कल्पवृक्षाची सावली.१
भवसिंधू पार करीती,
स्वामीराज माऊली,
सर्व ताप व्याप हरीती,
कृपासिंधू माऊली.२
अक्कलकोटी राहूनी,
भक्त कल्याण साधीती.
वाट चुकल्या जीवाशी,
मार्ग मोक्षाचा दावीती.३
नयनांसी वाटे सुख,
स्वामी दर्शन घेताना
त्रैलोक्याचे भेटे सुख,
नमीता स्वामी पादुकांना.४
कलीयुगी अवतार ,
श्री दत्त दिगंबरांचा.
मनोभावे शरण जावे,
मिळवू प्रसाद स्वामींचा.५
कवी श्री रेवाशंकर वाघ,ठाणे

मुख्यसंपादक