मुंबई ( प्रतिनिधी ) -: राज्यत ग्रामपंचाती चे वातावरण तापले आहे. मात्र काही ठिकाणी सरपंचपदासाठी लाखो रुपयांची बोली लावून ते विकत घेतले . हा धक्कादायक प्रकार व्हिडीओ आणि बातम्यांच्या रुपात बाहेर आला आणि त्यामुळेच राज्याच्या निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली. आणि सर्व जिल्हाधिकारी यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी दिले. उमेदवारी मागे घेण्यासाठी अन्य उमेदवारांना दवाब टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रसंग होऊ नयेत. त्यासाठी अहवाल सादर करा.
त्यासोबत सरपंचपदाच्या लिलावाच्या घटना घडल्या असल्यास त्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यसंपादक