Homeघडामोडीपरोली बंधाऱ्यावर विसर्जानादिवशी प्रशासनाने योग्य व ठोस नियोजन करावे - आकाश शिंदे

परोली बंधाऱ्यावर विसर्जानादिवशी प्रशासनाने योग्य व ठोस नियोजन करावे – आकाश शिंदे

आजरा (हसन तकीलदार ):-आजरा येथील परोली रस्त्यावरील चित्री नदीवर बंधारा असून या ठिकाणी गांधीनगर, आवंडी वसाहत, नवरेकर कॉलनी, शिव कॉलनी व आयडियल कॉलनीतील रहिवासी गौरी, गणपती तसेच दुर्गा विसर्जन करतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा जिवीत हानी होऊ नये यासाठी याठिकाणी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करावीत यासाठी आकाश शिंदे यांचे नेतृत्वात येथील युवा कार्यकर्त्यांनी आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना निवेदन दिले आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, परोली या गावाकडे जाण्याच्या मार्गावरील चित्री नदीवर संपूर्ण आजरा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल बांधले आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या नदीकाठावर गांधीनगर, आवंडी वसाहत, नवरेकर कॉलनी, शिव कॉलनी तसेच आयडीयल कॉलनी येथील सर्व रहिवाशी गौरी, गणेशमूर्ती तसेच दुर्गामाता मूर्ती विसर्जन करतात परंतु मागील वर्षी या ठिकाणी आकस्मिक व अपघाती पद्धतीने चार युवाकांचा मृत्यू झाल्या कारणाने या ठिकाणी एक प्रकारचे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. परंपरेनुसार याठिकाणी विसर्जनाचे कार्य होणार असून सदर दिवशी अशा प्रकारच्या घाटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने याठिकाणी ठोस पावले उचलून सुरक्षा यंत्रणा वाढवून योग्य त्या सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


यावेळी योग्य ती पावले उचलत सोयी सुविधासाठी उपाययोजना करण्यात येतील व खबरदारी घेण्यात येईल अशी सकारात्मक भूमिका मुख्याधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य नियोजन केले जाईल असे सकारात्मक उत्तर दिले. भविष्यात नगरपंचायतीने या नदीकाठी पायऱ्या बांधून घाटाची सुविधा करणेसाठी फंड उपलब्ध केल्यास एन. ओ. सी. साठी पाटबंधारे विभाग सहकार्य करेल असेही यावेळी सांगण्यात आले. निवेदन देताना धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ गांधीनगरचे सर्व कार्यकर्ते, आवंडी वसाहत, नवरेकर, शिव, आयडीयल कॉलनीचे रहिवासी उपस्थित होते.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular