Homeमुक्त- व्यासपीठसाहेब ; ही पोरं कायबी करू शकतील आगदि कायबी

साहेब ; ही पोरं कायबी करू शकतील आगदि कायबी

|| साहेब ||

साहेब,
ही शेतकऱ्यांची पोरं
कायबी करू शकतील
आगदी कायबी…


कदाचित हातात रूमणं घेवून
तुमचं डोकेबी फोडतील
किंवा …..
वखराच्या पासा
तलवार म्हणून वापरतील
ही पोरं कायबी करू शकतील


साहेब,
एका ढोरखुंब्यात
बैलाला वाकवणारी ही पोरं
त्यांच्या इरोधात कायदं
करणारी शोषण व्यवस्था आशीच राहिली तं
तुमचा मणकाबी मोडुन टाकतील

परिपक्व झालेली कणसं खुडून घ्यावी
तशा तुमच्या मानाबी खुडून घेतील

http://linkmarathi.com/अनाथांची-माय-डॉ-सिंधुताई/

तुमच्यातील वामनाला
ही पोरं जिवंत जाळुन टाकतील
साहेब

ही पोरं कायबी करू शकतील
आगदि कायबी


         -संतोष पाटील
        
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular