Homeबिझनेसस्वतःच्या व्यवसायाचा ब्रॅण्ड कसा करावा

स्वतःच्या व्यवसायाचा ब्रॅण्ड कसा करावा

सुनील दिवाळी निम्मित एका नामांकित कंपनीची गाडी घेण्यासाठी आला होता. तेथील शोरूम मालकाने गाडीची किंमत ८०,६०० (८० हजार ६००रुपये) सांगितली . तेव्हा सुनील ने सेल्समन ला या शोरूम मध्ये याच कंपनी चे हे मॉडेल ८०, १०० (८० हजार १०० रु) ला आहे . मग इथे जास्त का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर तुम्हाला तिथेच घ्यायचे ना मग इथं येऊन तुमचा आणि माझा वेळ का व्यर्थ करता असा शब्दाला शब्द वाढत गेला , त्यांच्यातील हा वाद ऐकून सिनिअर सेल्समन तिथे आला त्याने अर्धवड माहिती ऐकुन सुनील लाच तुम्हाला घ्यायची तर घ्या नाहीतर चालते व्हा तुमच्यासारखे अजून बरेच ग्राहक आमची वाट पहात आहेत असे सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
सुनिल ला तीच गाडी घ्यायची होती म्हणून तो पूर्वीच्या शोरूम मध्ये गेला . बोलता बोलता त्या शोरूम मधील प्रकार त्याने सांगितला. त्या वेळी उदय (ह्या शोरूम मधील सेल्समन ) ने आमच्या कंपनीच्या माणसाच्या वतीने मी तुमची माफी मागतो . असे म्हणत आपल्याकडे किंमत का कमी आहे त्यांच्याकडे का जास्त आहे याचे सविस्तर माहिती दिली. ती सुनील ला पटली आणि त्याने उदय च्या शोरूम मधूनच गाडी बुक केली. व घरी व जवळच्या आपल्या मित्रांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यामध्ये एकाच नामांकित कंपनीची २ अधिकृत केंद्रे दिसतील; पण दोन्ही परस्पर भिन्न. उदय ने आपल्या विनम्र स्वभावामुळे सुनिल सारखा ग्राहक कायमस्वरूपी मिळवला तर दुसर्याने तो कायमचा गमावला.

कोणताही व्यवसाय करताना या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या असतात.

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/

१) कोणताही ब्रॅण्ड एका दिवसात बनत नसतो त्यासाठी अनेक दिवस , महिने ,वर्षे लोटली जातात. त्यामुळे आपल्या ब्रॅण्ड ला घातक ठरेल असे वर्तन तोट्यातच नेते.

२) काही लोकांना वाटते की व्यवसायाची सर्व जबाबदारी त्या नामांकित कंपनी ची असते पण वास्तविक पाहता त्यासाठी ज्या-त्या शाखेनी ही प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

३) वस्तू जर दीर्घकाळ टिकणारी असेल तर ग्राहक शे-पाचशे च्या कमी-जास्त किंमतीकडे फारसे लक्ष न देता विक्रेत्यांची विश्वनियता पाहतात.

४) अनेकदा मालक सणासुदीला नोकरांना तर कामावर बोलवतात पण स्वतः मात्र येत नाहीत; अश्या वेळी नोकरांची चिडचिड होते व दुकान उघडण्याचा फायदा होण्याचे सोडून नुकसानच जास्त होते.

५) सर्वसामान्य माणूस तुमच्या प्रॉडक्ट्स ची टेव्ही वर कोण जाहिरात करतोय यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून अनुकरण करतात. व त्यांनाच प्राधान्य देतात.

६) बऱ्याचदा एक वाक्य तुमच्याबद्दलचे मत बनवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. वरील गोष्टी मध्ये “आमच्या माणसाच्या वतीने मी तुमची माफी मागतो” असे बोलून उदयने स्वतःला नामांकित ब्रॅण्ड सोबत जोडून घेतले आणि त्याचाच त्याला फायदा झाला.

७) टेव्ही वरील लाखोंच्या जाहिरातीपेक्षा जास्त परिणामकारक जाहिरात ही मौखिक असते. त्यासाठी कोणतेही वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत फक्त दोन आपुलकी चे शब्द पुरेसे आहेत.

http://linkmarathi.com/क्रिमरोल/


त्यामुळेच म्हणतात व्यवसाय करताना “डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर” ठेवावी लागते.

http://linkmarathi.com/स्टार्टअप-म्हणजे-काय/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular