HomeUncategorizedस्वातंत्र्य दिन - विशेष लेख

स्वातंत्र्य दिन – विशेष लेख

देश आपला शौर्याचा अन् त्यागाचा
सैनिकाच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा…
सह्याद्रीच्या अभिमानाचा
विविधतेने नटलेल्या परंपरेचा

जगाच्या नकाशात भारताचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे तो का? तर भारतावर परकीयांचे साम्राज्य स्थापित असतानाही त्यावर अनेक शूरवीराने स्वबळावर स्वातंत्र्य निर्माण केले.१९४७ सालचा भारत पाहिला तर साक्षरतेचे प्रमाण अत्यंत अल्प,कमी शैक्षणिक सुविधा,तसेच साक्षरतेची जनजागृती नव्हती, कुठली शैक्षणिक साधने नव्हती, अंधश्रद्धेचा घेराव घातला होता. असाच भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काळ बदलू लागला आणि विकासाच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल पुढे ठेवू लागला. संथ गतीने भारताची तांत्रिक सुधारणा होऊ लागली. भरपूर कॉन्ट्रॅक्ट जी विदेशी कंपन्यांकडून हाताळले जात होते ते भारताने स्वतःकडे काबीज करून घेतले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भारत स्वातंत्र्याच्या दिशेने वळू लागला

अनेक महापुरुषांच्या पराक्रम,साधू संतांची शिकवण, त्याचप्रमाणे रूढी परंपरेची जपणूक करीत भारत एकेक पाऊल पुढे टाकू लागला पण हे सोप्पं नव्हतं ते तेवढेच खरं.अनेक देशाच्या खुरापती सीमेवर घडत असताना वीर सैनिकांनी त्यांचे हरेक आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले आणि अनेक खाच खडग्यांनी भारताने आजचे सुवर्णकाळ अनुभवले आहे. जगभरात भारताचे एक वेगळेपण टिकून आहे ते का तर आपल्या या इतिहासामुळे.

स्वातंत्र्य म्हणजे काय?
स्वातंत्र्य हेच मोक्ष…….
पारतंत्रात आपण लाचार होतो, कोणाचे तरी गुलाम होतो आणि म्हणूनच तेव्हा लोक सांगायचे की स्वातंत्र्य हेच मोक्ष म्हणून अवघे 200 वर्ष लढा देऊन अनेक क्रांतिकारकांनी भारताच्या हरेक नागरिकाला मोक्ष मिळवून दिले.

गौतम बुद्धांचे एक वाक्य आहे, छोटीशी चिमणी सुद्धा स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिव चिव करते तर आपण माणसं आहोत मग आपण आपल्याच भारतात गुलाम म्हणून का राहायचं स्वच्छंदपणे का जगू शकत नाही.माणसालाही स्वातंत्र्य आहे याची जाणीव कधी होईल.
अशाच विचारवंतांमुळे,क्रांतिकारकांमुळे आज भारतात स्थैर्य टिकून आहे.

भारताचे वैशिष्ट्य हे आहे की वैज्ञानिक प्रगती बरोबर आपली आध्यात्मिक परंपरा यांचा योग्य संगम एकत्रित करून आपण विकासाच्या दिशेने पुढे येत आहोत. आणि याचमुळे संपूर्ण जगासमोर आपल्या या संस्कृतीचे,ऐक्याचे गोडवे गायले जातात. जेव्हा एक वैज्ञानिक देवा समोर हात जोडून नतमस्तक होतो, घराच्या उंबराला हात लावून,कपाळी गंध लावून घरा बाहेर पाय ठेवतो तेव्हा दर्शन होते ते भारतीय संस्कृतीचे.

लाभले आम्हास भाग्य जन्मले या भूमीत
दाही दिशा नाद घुमत अवघा भारत महान.
जाती धर्म रूढी परंपरांनी भरलेला संस्कृतीचा वारसा जपणारा माझा स्वातंत्र्य भारत देशाचा तिरंगा फडकत राहो. ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा हा दिवस शौर्याचा आणि त्यागाचा तुमचा आमचा आणि देशासाठी लढणाऱ्या हर एक वीर जवानांचा.

साधू संतांची भूमी आपली
क्रांतिकारकांची अन् हुतात्म्यांची
शिवरायांच्या पराक्रमाने गाजलेली
विविध पैलू असूनही एकमेकात गुरफटलेली.

लेखिका –
नेहा नितीन संखे ( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular