Homeघडामोडीहिंदुहृदयसम्राटांच्या स्मृतिदिनानिमित्त..

हिंदुहृदयसम्राटांच्या स्मृतिदिनानिमित्त..

    शिवसेनाप्रमुख बाळ केशव उर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात मराठीपणाचा अभिमान रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला केली. त्यांची लेखनशैली त्याच्या भाषणाइतकीच प्रभावी होती.    पहिल्याच मेळाव्यात त्यांनी शिवाजी पार्क , मुंबई येथे ५ लाखाच्या वर गर्दी खेचून आणली होती. १९६० रोजी फ्री प्रेस मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून स्वतःचे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. 
      मी असं बोललोच नाही अशी सावरासवरी ची भूमिका कधी घेतली नाही. जे आहे ते ठोक आणि मेळाव्यात जास्तीतजास्त ३-४ मुद्दे घेऊन बोलणे , ८०:२० % समाजकारण -राजकारण या सूत्राचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना link मराठी कडून नमन..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular