उत्तुर ( अमित गुरव ) – हेल्पिग हँड उत्तुर ग्रुप ने सामाजिक बांधिलकी जपत रक्ताची गरज ओळखून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सरपंच वैशाली आपटे यांनी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. तर ACP नाईक यांनी फित कापून ग्रुप ला शुभेच्छा दिल्या.
यावेळी ९२ तरुणांनी रक्तदान केले. कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्राम सफाई कामगाराचा हेल्पिग हँड उत्तुर ग्रुप च्या वतीने आनंदा लाखे, आनंदा कुंभार, लक्ष्मण नाईक, विलास कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. त्याच पध्दतीने बहिरेवाडी चे सुपुत्र शहीद जवान ऋषी जोंधळे यांच्या वडिलांचा सत्कार ग्रुप च्या वतीने करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हेल्पिग हँड ग्रुप ची स्थापना झाली असून रक्तदान शिबीर हे सामाजिक उपक्रमाचे पहिले रोपटं असून आम्ही याचा वटवृक्ष करू असे ग्रुप च्या वतीने वैभव गुरव यांनी लिंक मराठी शी बोलताना मत व्यक्त केले.
वसंतआण्णा धुरे, विठ्ठल उत्तुरकर , डॉ.सचिन धुरे उपस्थित होते. संतोष गाड्डीवडर , साहिल मोदर , प्रसाद श्रेष्ठी , सतीश गाड्डीवडर , ओंकार दड्डीकर , आकाश कांबळे , अक्षय वेसणेकर , ऋतिक रेडेकर, प्रितेश पटेल , गोपी देसाई, सचिन कांबळे, ओंकार दाभोळे , चेतन गाड्डीवडर , प्रज्वल पाकले , जगदीश पाटील , निलेश जाधव , फिरोज मुलानी , यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली होती.
मुख्यसंपादक