Homeमुक्त- व्यासपीठहे विघ्नहर्ता

हे विघ्नहर्ता


तु सुखकर्ता,हे दु:खहर्ता
आणशिल का,छान सुवार्ता
बघ आगमन तुझे,कसे हे
तुच सोडवून टाक,आता हा गुंता

महामारीच्या या,राक्षसाचा कहर
शांत झाले कसे,गाव शहर
जिकडे पहावे तिकडे,कोरोनाची खबर
तोंडाला मास्क आणि माणसामाणसात अंतर

आठव गतवर्षीचा तो,जल्लोष आगमनाचा
बॅण्डंबाज्याच्या समोर,नाच उत्साही मुलामुलींचा
गुलाल,चिरमु-याची करीत उधळण
थाट भलताच तुझा तो,मंडंळ,घरप्रवेशाचा

पर सांगू का एक, तुला गणराया
जीव आतुरलेला असायचा तुला पहाया
दर्शन झाले तुझे,पदोपदी आता हल्ली
जो लागला अथक,कोरोनाशी लढाया

डॉक्टराच्या रूपात घडवून दर्शन
पोलीस वर्दीतून, तु करून रक्षण
स्वच्छतेसाठी ही झटणारा कर्मचारी
रूप दाखवून गेला,करताना कोरोनाचे पतन

कल्पनाविलास कींवा असावास भास तु
जणू मानवाच्या श्रध्देचा,पुर्णविराम असावास तु
विश्वास ठेवला मग,त्याने अढळ तुझ्यावर
त्याच्यावरचे संकंट,दूर करशिल ना तु

प्रतिष्ठान तुझे,दरवर्षी वेगवेगळ्या रूपातले
वर्षभर मात्र पाहीले,रूप तुझे चालते बोलते
आभार आणि श्रध्दा,मग रीती करण्यापोठी
कोरोनाशी लढणा-या,या देवांच्याकडे मन माझे वळते

  • निशिकांत कांबळे


अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular