Homeमुक्त- व्यासपीठ🙏 धन्यवाद… २०२२

🙏 धन्यवाद… २०२२

२०२२ राग नाही, रुसवा देखील नाही तुझ्यावर
खूप वाईट प्रसंग दाखवलेस
पण काही सुखद धक्के सुद्धा दिलेस

काही लोकांना गमावले
पण लाखमोलाच्या व्यक्तींना जवळ आणलेस

चांगले वाईट अनुभव दिलेस
पण त्यातूनही मार्ग दाखवलेस

दिशाहीन होण्यापासून वाचवलेस
आणि स्वप्नांना दिशा दिलीस

माणसातले राक्षस रूप दाखवलेस
आणि दाखवलेस माणसातले देवपण ही तूच

वाईट माणसांकडून खूप काही शिकले
त्यातूनच आपले कोण आणि परके कोण हे उमगले

धन्यवाद २०२२ तू खूप काही शिकवलेस
हे वर्ष खऱ्या अर्थाने जीवनाचे अर्थ शिकवून गेले

२०२३ तुझे मनापासून स्वागत
जुने सगळे लक्षात ठेवून झालेल्या चुका सुधारत नवीन वर्षाची सुरुवात करू

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular