Homeघडामोडीसह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार विभाग आयोजितभव्य किल्ले बांधणी स्पर्धा २०२१ वसई तालुका मर्यादित

सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार विभाग आयोजितभव्य किल्ले बांधणी स्पर्धा २०२१ वसई तालुका मर्यादित

गड-कोट-दुर्गांबाबत लहान मुलांमध्ये आवड व ओढ निर्माण व्हावी तसेच तरुणांमध्ये असलेल्या किल्ले संवर्धनाबद्दलच्या जाणिवेला योग्य दिशा लाभावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

🔴 स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक पारितोषिकांसाठी निवडण्यात येतील.

🔴👉त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.

🟢 १८ वर्षा पर्यंत चे स्पर्धक सहभाग घेऊ शकतात
🟢
👉 स्पर्धेचे नियम व अटी :

1️⃣ स्पर्धेसाठी किल्ला बनविताना कमीत कमी १ जण किंवा जास्तीत जास्त ५ जणांचा १ गट ( ग्रुप ) असावा.

2️⃣ किल्ल्यासाठी योग्य ते स्थळ अथवा जागा स्पर्धकांनी स्वतः निवडून ४ नोव्हेंबर २०२१ च्या आधी किल्ला पुर्णपणे बनवुन तयार असणे आवश्यक आहे.

http://linkmarathi.com/श्री-धारेश्वर-स्वयंभू-दे/

3️⃣ किल्ल्यांना परिक्षक स्वतः येऊन भेट देतील.

4️⃣ किल्ला स्व-हस्त कौशल्यातून व पर्यावरणपूरक बनविलेला असावा. थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिकचा वापर टाळा. किल्ला लाल माती, शाडू माती, कागदी किंवा पुठ्ठ्याचा बनवू शकता.

5️⃣ स्पर्धकांना किल्ल्याबाबत भौगोलिक व ऐतिहासिक सविस्तर माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही ते आमच्या परीक्षकांसमोर मांडू शकाल.

6️⃣ किल्ल्या शेजारी स्पर्धकांनी आपल्या गटाचे व किल्ल्याचे नाव नमूद करणे बंधनकारक राहील.

7️⃣ स्पर्धेत प्रवेशाकरिता नावनोंदणीची शेवटची तारिख : ३१ ऑक्टोबर २०२१

http://linkmarathi.com/कालदुर्ग-किल्ला-टकमक-किल/

8️⃣ स्पर्धेसाठी ₹ ५१ /- प्रवेश-शुल्क भरुन आपण आपला सहभाग नोंदवू शकता.

🚩सहभागाची प्रक्रिया 🚩
◆ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे माहिती आमच्या वॉट्सअप क्रमांकावर पाठवा.

१. तुमचे किंवा तुमच्या गटाचे नाव :

२. किल्ल्याचे नाव आणि किल्ल्याचा प्रकार :
[ उदाहरणार्थ – सिंधुदुर्ग (जलदुर्ग) ]

३. कमीत कमी १ किंवा जास्तीत जास्त ५ स्पर्धकांचे नाव आणि वय :

४. संपुर्ण पत्ता :

http://linkmarathi.com/शनिवारवाडा-वैशिष्ट्य-आणि/

५. एकूण ३ जणांचे संपर्क क्रमांक :
(कॉलिंग व वॉट्सअप क्रमांक वेगळा असेल तर तो सुद्धा द्यावा.)

🟣 प्रवेशासाठी संपर्क
अनिकेत कुडतरकर :- ९९६०९८१९६२
दिपेश सोगम :- ९९२३३९९२८४
विजय पराडकर :-९५७९५२१६७४
सुरज पाटील :-८४८५०७१२३०
मनोज मोरे :- ९५९४२१३८०८

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/

( टिप – फक्त या स्पर्धेच्या उपक्रमाचे आणि बक्षीस समारंभाच्या वेळापत्रकाचे सर्व अधिकार
सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभागकडेच राहतील. )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. नमस्कार –
    आज आपला इतिहास कुठेतरी मागे पडत चालला आहे, तसेच इतिहास फक्त पुस्तकातल्या पानांपुरताच मर्यादित न राहता प्रत्येकाच्या मना-मनांत रुजला पाहिजे. याच हेतूने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.
    तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे…

  2. आपल्या पाल्याला गड किल्ले बनवायला प्रेरित करा
    व त्यांना गड किल्ल्या वर सोता रिसर्च करण्यास प्रोत्साहन द्या
    जेणे करून त्यांना गड किल्ल्याची आवड लागेल
    फक एक स्पर्धा ठेवणे हाच आमचा उद्धेश नाही आहे.

- Advertisment -spot_img

Most Popular