Homeघडामोडीलिंक मराठी बातमीचा इम्पॅक्ट.. वृद्ध निराधार गंगाराम कांबळेंना मदतीचा ओघ सुरू

लिंक मराठी बातमीचा इम्पॅक्ट.. वृद्ध निराधार गंगाराम कांबळेंना मदतीचा ओघ सुरू

आजरा (हसन तकीलदार) :-आरदाळ ता. आजरा येथील 80 वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. गंगाराम कांबळे यांची बातमी सर्वप्रथम लिंक मराठी चॅनेलने प्रसिद्ध केली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच या सर्वांनी मिळून समाज मंदिरात केली आहे. तात्पुरता निवारा गंगारामला मिळाला आहे. आणि इतरही मदतीचाओघ सुरु आहे. त्याबद्दल कॉ. शिवाजी गुरव यांनी लिंक मराठी चॅनेलचे आभार मानले.

कोणाचाही आधार नसलेले गंगाराम कांबळे यांना डोक्यावर छप्परही नाही. आणि जीव मुठीत घेऊन जगत असलेबाबतची माहिती कॉ. शिवाजी गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली होती त्यानुसार आमच्या चॅनेलमार्फत याबाबत आवाज उठवला होता आणि प्रशासनाला जाब विचारण्याचे काम केले होते. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत समाज मंदिरात तात्पुरती राहणेची व्यवस्था केली आहे. आणि त्याचप्रमाणे अवघ्या आठ ते दहा दिवसात मदतीचा ओघ सुरू झाला. तहसीलदार यांच्यापासून सर्वांनी त्यांची काळजी घेतली. उत्तुर येथील हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन यांनी छताची जबाबदारी घेतली. जमिनीवर भर टाकून ऒल कमी करण्यासाठी भर टाकण्याची जबाबदारी आरदाळकर ग्रुपने घेतली तर शंभर रुपयात समाजसेवा या उत्तूर परिसरातील ग्रुपने फरशी बसवण्याची जबाबदारी घेतली आहे.

गंगारामच्या वयाचा विचार करून विघ्नहर्ता सोशल फाउंडेशन यांनी त्यांना चटई, ब्लॅंकेट, स्वेटर यासह काही वस्तू भेट दिल्या आहेत. माणुसकी अजूनही जिवंत आहे या भावनेतून मदत देणाऱ्यांची गंगाराम कांबळे यांनी भाऊक होत हात जोडून आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव व अमोल बांबरे यांनी देखील मीडियाचे आभार मानले. माणुसकी जपण्याचा लिंक मराठी चॅनेलने प्रत्येकवेळी काम केले आहे. सामाजिक जबाबदारी समजून आमचे चॅनेल काम करीत आहे त्याबद्दल सर्व स्तरातून चॅनेलचे कौतुक होत आहे.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

You Tube लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular