Homeघडामोडीआता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याचे संकेत

आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याचे संकेत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजचं उदघाटन झालं. उदघाटन कार्यक्रमात अमित शहा यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. याशिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गात चांगलं यश मिळवून दिलं आहे. यामुळे अमित शहा हे नारायण राणे यांच्यावर खूश झाले असून त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

नारायण राणे यांच्या ‘लाइफटाइम’ या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहा यांनी नारायण राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचं म्हणत त्यांच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. 

नारायण राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नाही

“नारायण राणे हे जिथं अन्याय होतो तिथं निडरपणे संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायाविरोधात लढू शकत नाही. तो जनतेसाठी देखील लढू शकत नाही. नारायण राणे हे अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द वळणावळणाची राहीली आहे. पण राणे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो. राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं हे भाजपला चांगलं समजतं”, असं अमित शहा म्हणाले. शहा यांनी या विधानातून राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. 

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular