कुणी येऊन उद्धार करेल याची वाट न पाहता स्वयंप्रकाशित व्हा, स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक व्हा.
मी सांगतो म्हणून त्यावर आंधळा विश्र्वास न ठेवता स्वत:च्या ज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्या. इथे प्रत्येकजण बुद्ध बनू शकतो – भगवान गौतम बुद्ध.
जगात दुःख आहे हे मान्य करुन त्याची कारणे शोधून ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा बौद्ध धम्माचा पाया आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वात महान बौद्ध #धम्म असून बौध्द तत्त्वज्ञानात जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा या बाबींचा विचार नाही. स्त्रिशिक्षणाचा व कनिष्ठ जातिंच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. नालंदा हे जागतिक दर्जाचे बौद्ध विद्यापिठ म्हणून ओळखले जाई.
इतर धर्मांमध्ये परंपरेप्रमाणे चालणाऱ्या सर्वच गोष्टी कालसुसंगत नसतात पण त्यावर शंका उपस्थित करणे, चिकित्सा करणे म्हणजे धर्म बुडवे, पापी समजले जाते पण बुद्धांनी सांगितलेल्या ज्ञानावर, धम्मावर शंका, प्रश्न उपस्थित करण्याची व वैचारिक स्वातंत्र्याची मुभा आहे. बुद्धांनी सांगितलेल्या शिल व मार्ग समजून घेऊन त्याचे पालन व मार्गक्रमण केल्यास आपण स्वयंप्रकाशित होऊन जगाला प्रकाशमान करण्याची कुवत निर्माण करु शकतो.
भारतीय बौद्ध संस्कृतीचा प्रचार, प्रसार संपूर्ण जगात झाला. इतर सर्व धर्म संस्थापकांनी किंवा धर्माचा विचार सांगणाऱ्यांनी स्वत:ला परमेश्वर, परमेश्वराचा दूत, परमेश्वराचा पुत्र किंवा प्रेषित सांगितले आणि इतर कोणत्याही गोष्टींना जास्त महत्त्व न देता परमेश्वराला शरण जाण्याला, परमेश्वर या संकल्पनेलाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले. गौतम बुद्धांनी जन्मापूर्वी काय, जन्मानंतर काय यासंबंधी न भरकटवता जगण्यासंबंधी मार्गदर्शन केले. ज्या काळात वैदिक धर्म आणि ब्राम्हण्यवादाचे शासन होते आणि त्याविरुद्ध बोलणे, त्याची चिकित्सा करण्याची कुठलीच मुभा नव्हती, पापी समजले जाई; त्यावेळी गौतम बुद्धांनी जगाला अत्यावश्यक असणारा मानवतावादी, समतावादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धेला थारा नसणारा आणि चिकित्सा करण्याची, शंका उपस्थित करण्याची मुभा देणारा बौद्ध तत्त्वज्ञान सांगून बौद्ध धम्म स्थापिला. वर्तमान स्थितिमध्ये सुद्धा इतर सर्व धर्मांमध्ये चिकित्सा करण्याची मुभा नाही आणि केल्यास धर्मबुडवे समजल्या जाते, अफवा किंवा द्वेष पसरवून जातिय दंगली भडकविल्या जाते म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. कारण बुद्ध तत्त्वज्ञान सर्व तृष्णांपासून मुक्ति देणारे आणि दुःखाचे निराकरण करणारे आहे. फक्त ते एकवेळेस पूर्ण समजून घेणे महत्त्वाचे आहे मग पचवणे काहीच जड नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही धर्माचे असो किंवा कुणाचेही अनुयायी असो, #बौद्ध तत्त्वज्ञानाला समजून घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहा. #बुद्धम् #सरणम् #गच्छामी म्हणजे बुद्धाच्या विचाराचे, तत्त्वज्ञानाचे चिकित्सक बुद्धीने अनुसरण करा. पण सद्या गौतम बुद्धांचे फक्त नाव घेणे, त्यांची वंदना करणे एवढेच शिल्लक राहिले का? असा प्रश्न पडतो कारण बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालणारे किंवा त्याचे अनुसरण करणारे फार तुरळक दिसतात. म्हणून गौतम बुद्धांना फक्त एक व्यक्ति म्हणून मूर्तीपूजेपूरते मर्यादित न ठेवता त्यांना एक वैश्विक विचार म्हणून सर्वांनी स्वीकारावे.
मागील १० हजार वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातिच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील अॉक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आपल्या तत्त्वज्ञानाने, महान विचाराने संपूर्ण जगाला प्रभावित करणारे महान तत्त्वज्ञानी तथागत गौतम बुद्ध ज्यांची भुमी म्हणून भारताची ओळख केली जाते. बुद्ध एक व्यक्ति पेक्षा एक महान विचार आहे आणि आपण हा विचार जाणून घेऊन अंगिकृत केल्यास आपल्या आयुष्यात कधीच सुखदुःखाची आसक्ती न राहता स्थितप्रज्ञता येईल व आपण स्वतः (अत्त दिप भव) स्वयंप्रकाशित होऊ.
#तथागतगौतमबुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
- मनोज गावनेर
मंगरुळ चवाळा (अमरावती)
मुख्यसंपादक
धन्यवाद