एक होता लेखक….
भाग — ४
बार क्लोज झालाय सर.….
आता तुम्हाला निघायला हवं.
रात्र फार झालीय तुम्ही उठा आता.
वेटर त्याला अदबीने सांगत होता.
एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते.
कोल्हापुरातल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूचा बियरबार बंद होण्याची ही नेहमीची वेळ.
पण सगळे बेवडे निघून गेले तरीही त्याचं पिणं चालूच होतं.
ए….. वेटर…..
वेटर्रर्रर्रर्रर्र……
काय पाहिजे…?
वेटरचा प्रश्न.
चकना आण.
आणि सोबतीला…..
एक बाटली घेऊन ये.
फूट…..
च्याइचं वेटर हेच्या….
तो तोंडातल्या तोंडात शिव्या देत पुटपुटला.
साहेब… बाटली आणतो पण शिव्या देऊ नका.
वेटर म्हणाला.
तू काय सांगतो रे लेकाच्या…..
शिव्या देऊ नको म्हणजे काय…?
तो धडपडून उठत म्हणाला.
साहेब हे आती होतंय.
आणि तुम्ही भरपूर प्यायली ही आहे.
आता घरी जावा.
बार बंद करण्याची वेळ झालीय.
इतकंच बोलला वेटर.
पण ते शब्द सहन करण्याइतकंही भान नव्हतं त्याला.
भरपूर प्यायलीय म्हणजे काय…?
मी माझ्या पैशाची पितोय.
कुणाच्या बापाच्या पदरची पित नाही.
आणि ए….
एका बापाची औलाद असशील ना….
तर बाटली दे आणून.
तो धडपडत म्हणाला.
साहेब…बापाला मध्ये आणायचं नाही हं सांगून ठेवतो.
एव्हाना त्याचाही राग उफाळला होता.
मी देणार शिव्या…. कुणाच्या बापाला भीत न्हाई आपण.
अरे….. रायटर हाय मी…
रायटर.
शाहू स्मारक भवन पासून केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत कुणाला ही विचार
आपलं नाव.
अरे आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय.
आणि तू काय विचारतो रे भोसडीच्या.
इतकंच बोलू शकला तो.
आणि वेटरने त्याच्याकडे झेप घेतली.
काय म्हणतो रे ….
हेच्या आईचं पेताड हेच्या.
ए बाहेर या रे सगळे.
असं म्हणत वेटरने दोन कानसुलात ठेऊन दिल्या.
तो धडपडत मागे तोल जाऊन पडला.
डोकं फुटलं.
रक्त वाहू लागलं.
तोपर्यंत ४/५ वेटर बाहेर येऊन त्याला लाथा बुक्यांनी हणू लागले.
अरे मारू नका रे…..
मारू नका….
आई….मेलो….
सोडा रे मला….
सोडा….
तो कण्हत पुटपुटू लागला.
पिणाऱ्या माणसाला कुठे शुद्ध असते स्वतःची?
तो जे बोलतो ते त्याची दारू त्याला बोलायला लावते.
नाहीतरी दारुडा हा शक्तीहीनच असतो म्हणा.
त्याची शुद्ध हरपत चालली होती.
याला गाडीत कोंबून रंकाळ्याच्या तलावावर सोडून या रे.
बार मालकाने आदेश दिला.
आणि २/३ वेटर त्याला गाडीत कोंबून रंकाळ्याच्या दिशेने रवाना झाले.
त्याला रंकाळ्यावर सोडून आले तेंव्हा रात्रीने आपला शालू गडद पांघरून घेतला होता.
त्या शांततेत रंकाळ्याच्या संथ लाटा काठावर आदळत होत्या.
माघारी वळत होत्या.
कुठेतरीच कुत्र्यांची गुरगुर ऐकू येत होती.
त्यात रंकाळ्याच्या खळखळ करणाऱ्या पाण्याचा आवाज मिसळत होता.
दिवसभर पर्यटकांनी फुलून जाणारा हा रंकाळा रात्री जेंव्हा काठावर मुटकुळे होऊन बेवारस पडतो ना….
तेंव्हा तो मला नुकत्याच पोरक्या झालेल्या निरागस मुलासारखा वाटतो.
त्याच्या आतलं दुःख जाणून कुणी त्याच्यावर मायेने हात फिरवलाच नाही.
याचंच शल्य मनात ठेवून काठावर असलेल्या शालिनी पॅलेस च्या भिंतीवरच्या घड्याळानेही हल्ली आपलं टिक टिक करणं बंद केलंय.
दुःख ज्याचं त्याचं.
ज्याचं त्यानंच सोसायचं.
जग फक्त आपल्या आयुष्याचा चित्रपट मिटक्या मारत बघत असतं.
त्याने कठड्याला धरून उठायचा प्रयत्न केला.
कमरेत बसलेल्या माराने त्याला उठता ही येत नव्हतं.
हवेत गारठा होता.
त्याचं डोक्यावरून ओघळणारं रक्त सुकलं होतं.
तरीही वेदनेची एक सनक डोक्यात यायची आणि त्याला हतबल करून सोडायची.
कसलं हे जीवघेणं दुःख.?
त्याने सरपटत सरपटत पायऱ्या गाठल्या.
ए मारू नका रे….
मी फार चांगला माणूस आहे. मला मारू नका रे…
तोंडातल्या तोंडात तो पुटपुटत होता.
डोळे वाहत होते त्याचे.
त्या रडण्यात त्याची हतबलता होती.
त्याचं पिळवटून टाकणारं दुःख होतं.
ते दुःख समजून घ्यायचा कुणी प्रयत्नच केला नव्हता.
कलाकाराचं दुःख फार वेगळं असतं.
सांगता ही येत नाही…
आणि सहनही करता येत नाही.
मग तो लिहीत राहतो वेड्यासारखा.
कागदाच्या प्रत्येक पानावर.
आणि लोकं म्हणत असतात ……
येडंच हाय हे जरा.
पण तो मोकळा होत असतो त्याच्या प्रत्येक शब्दांवाटे.
कागदाच्या प्रत्येक पानावर.
पायरी हाताशी लागली तसं तो सगळं बळ एकवटून उठून बसला.
समोर अथांग पसरलेला रंकाळा होता.
त्याचं दुःख ही रंकाळ्या एव्हढंच खोल आणि अथांग
होतं.
माणसाला दुःख हे हवंच.
पण इतकही नको की त्याची जगायची इच्छाच संपून जाईल.
वेदनेच्या एका ठराविक मर्यादेबाहेर माणूस गेला ना…
की तो माणूस राहत नाही.
तो फक्त पुतळा असतो.
जीव काढून घेतलेला शुष्क पुतळा.
आणि पुतळे बोलत नसतात.
आतल्या आत घुसमटत असतात.
अगदी त्याच्यासारखे.
त्या काळ्याकुट्ट रात्री संथ थडकणाऱ्या रंकाळ्याच्या लाटांकडे बघत त्याने काळजातून साद घातली.
रायटर……
आणि त्याचे अश्रू गंगेच्या अथांग प्रवाहासारखे वाहतच राहिले.
वाहतच राहिले.
क्रमशः …..
- दत्तात्रय श्रीकांत गुरव.
कोल्हापूर.
अभिप्राय अपेक्षित
मुख्यसंपादक
खूप छान