भाग ४८
धनसंग्रह /निधी संकलन ( Fund Raising )
अंदाजपत्रकामध्ये आवश्यकता दाखल्यानुसार निधी संकलन होणे आवश्यक ठरते.
अ) मोठ्या निधी संकलनाचे मार्ग :-
१) विविध स्वरुपात मिळणाऱ्या देणग्या ( स्मरणार्थ देणगी, जन्मदिवसाच्या निमित्ताने येणारी देणगी, स्वागत समिती सदस्य, विद्यार्थी दत्तक घेणे, सामान्य देणग्या ( Grneral Donations ) इ.
२) स्मरणिका अथवा संस्थेचे नियीमत प्रकाशन असल्यास त्याचा विशेषांक, जाहिराती, पृष्ठदान इ.
३) वस्तू रूपातील देणगी ( उदा. धान्य, शैक्षणिक साहित्य, गणवेश, भजनी मंडळासाठी वादन साहित्य,वैद्यकीय प्रकल्पासाठी वाहन. )
४) संस्थेचा एखादा विभागच दत्तक घेणे ( उदा. वाचनालय, बालवाडी, प्रा. शाळा, गोशाळा, मुलींचे सर्व शिक्षण )
५) मोठ्या विश्वस्त संस्थाकडून देणगी.
६) वर्षभरात एखाद्या दिवशी अभियान करून किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून ( जाणता राजा, ऐतिहासिक वा प्रबोधन व्याख्यानमाला इ.) निधी संकलन होऊ शकते.
ब) छोटे निधी संकलन :-
१) छोटया छोटया कूपब विक्रीतून शाळा महाविद्यालयातून.
२) तात्कालिक एखादा कार्यक्रम / शिबिरापुरती मदत बक्षिसे, भोजनव्यवस्था, छपाईचा खर्च इ.
३) वस्तू विक्रीतून ( वनवासी कला प्रदर्शन, दिनदर्शिका, भेटकार्ड, बचत गटांनी केलेल्या वस्तू.)
क) विशिष्ट फंडासाठी देणगी Corpus Donation :-
विशिष्ट कारणासाठी या मोठया योजनेसाठी निधी देण्याचे आवाहन : उदा. वसतिगृहाची इमारत, रुग्णालयांचे बांधकाम, सुसज्ज ग्रंथालय, वैद्यकीय प्रकल्पासाठी मोठया यंत्रसामुग्रीची खरेदी.
पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष निधी ( उदा. पाणलोट क्षेत्र विकासासाठी छोटे बंधारे, शेततळी, सौर उर्जेची व्यवस्था )
विदेशी मदत :-
आपल्या संस्थेकडे आवश्यक ते FCRA ( Foreign Contribution Regulation Act ) कायदयाखाली नोंदणी व त्यासाठी स्वतंत्र बँक खाते असल्यास, भरपूर देणगी विदेशातून मिळू शकते.
अनुदाने :-
विविध शासकीय, निमशासकीय खात्यांकडून देणगी, अनुदान, पुरस्कार यामधून निधी मिळू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थाकडूनही ( महानगरपालिका, नगरपालिका ) मदत मिळू शकते
अन्य :-
सहकारी बँका, मंडळे, प्रतिष्ठाने, साखर कारखाने, मोठे उदयोगपती / उदयोगघराणी यांच्यासाठीही योग्य प्रस्ताव तयार केल्यास मोठा निधी मिळू शकतो.
कर्ज :-
कमिशनच्या पूर्वपरवानगीने अत्यावश्यक असल्यास संस्था कर्जही काढू शकते.
निधी संकलन करताना घेण्याची काळजी :-
१. निधी स्वीकारल्यावर तात्काळ पावती देण्याची व्यवस्था हवी.
२. पावती पुस्तकांची योग्य व पुरेशी छपाई पावती पुस्तक कार्बन घालून द्विपध्तीचे असावे. त्यावर संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक (Pan No) हे असणे आवश्यक प्रत्येक पावतीचा सलग क्रमांक छापलेला असावा.
३. अंदाजपत्रकानुसार निधी संकलनाची योजना करावी त्या त्या वर्षीचे आग्रहाचे, गरजेचे, प्राथमिकतेचे विषयास प्राधान्य व अन्य गरजा.
४. निधी संकलनाची ४/५ जणाची समिती /समूह असावा. शक्यतो एकटयाने न जाता कोणालातरी बरोबर घ्यावे.
५. निधी संकलन ही जबाबदारी केवळ समितीची व मर्यादित कार्यकर्त्याची नाही तर सर्वांची आहे हा भाव सतत सर्वांमध्ये उत्पन्न होईल यासाठी प्रयत्न.
६. देणगी देणारे देणगीदार यांची मानसिकता, त्यांचे काही आग्रह-दुराग्रह याची योग्य हाताळणी.
७. संस्थेचे मूळ उदिष्ट व मिळणारी देणगी याचा मेळ,संतुलन रहायला हवे.
८. विशिष्ट कारणासाठी देणगी देणाऱ्यांची इच्छा लक्षात घेणे, त्याचा पाठपुरावा व पूर्तता करणे.
९. Anonymous Donations किंवा काही अवैद्य मार्गानीही निधी मिळण्याची शकता जेव्हा उत्पन्न होते. तेव्हा त्याचे धोरण, त्यातील धोके या विषयी सतर्क रहाणे व योग्य पातळीवर सामुहिक निर्णय घेणे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक