Homeघडामोडीधोका वाढला

धोका वाढला

‌ डेंग्यू ताप , मलेरिया, काविळ , हिवताप , पोटाचे विकार , सर्वात घातक लहान मुले मोठी माणसं , महिला , वयोवृद्ध व्यक्ती यांना याचा धोका जास्त असतो. अशी परिस्थिती आपल्याच गलथान कारभारामुळे आपल्या नशिबाला येते
‌ गावाचं रुपांतर शहरात झाले लोकसंख्या वाढली त्यामुळे‌ लोकांच्या राहण्याचा प्रश्न त्यामुळे वाढती दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती जागोजागी डोंगरासारखे कचरयाचे ढीग वाढती लोकसंख्या त्यामुळे नदीप्रमाणे वाहणारी गटारे. जागोजागी सार्वजनिक. भरलेली गटारी मुतारी यातून येणारा उग्र वास आपल्या नाकाला रुमाल लावून आपण वावरत असतो. आठवडा बाजार त्यातच. विकून शिल्लक राहीलेला भाजी पाला पाचोळा कुजकी नासकी फळे. यामुळे सुध्दा दुर्गंधी पसरते. आणि सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो
परवा मौसमी पण जोरात पडलेल्या पावसामुळे. रस्त्यात जागोजागी साठलेली. उगवलेली मोठ मोठी झुडपे. डपकी. चिखल. त्यातच गाढव. कुत्री. गाय म्हैस.मेलेले उंदीर. घुशी. अन्य जनावरे यांची विष्टा यामुळे भयानक येणारा. भयानक वास.पाऊस. उघडला पण आजून सुध्दा काही ठिकाणी पाण्याची डबकी अजून तसीच आहेत. परवा आपल्या जिल्ह्यात जवळपास १०५ गावांत पूराचे पाणी घुसले होते. त्यामुळे नदीच्या पूरातून वाहत येणारा कचरा. घाण. पूर ओसरल्यावर जागोजागी राहीली आणि आत्ता पाऊस उघडला आणि त्या घाणीचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध साथीचे रोग जसे. ढेंगू. मलेरिया. काविळ. हिवताप. पाण्यामुळे पोटाचे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे
वरील प्रमाणे सर्व सामान्य विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे त्यातच बाकी काही राहीले ते. शहराच्या बाजूला असणारे उपनगर यांनी काढली आहे. या भागात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोकळे भूखंड यांचें मालक जागा विकत घेऊन परगावी राहण्यास आहेत. त्यामुळे या जागेकडे वर्षातून काही वेळा येतात. त्याची स्वच्छता हा प्रश्न कायमच राहतो. मोकळ्या भूखंडावर पावसाळ्यात उगवणारी विविध वनस्पती असणारे डबरी यामुळे साठणारे पाणी व उगवणारी झाडे झुडपे यातील बहुतांशी जागा मोठ्या लोकांच्या आहेत यांना कोण विचारणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही लोक आपल सांडपाणी लोकांच्या दारात गटारात सोडत आहेत यामुळे यांवर डेंग्यू तापाचे मच्छर हजारो संख्येने जन्म घेतात आसपास राहण्यास असणार्या लोकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी नगरपालिका प्रशासन यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की या भुखंड मालकांवर कायदेशीर कारवाई.अथवा मोकळे भूखंड स्वच्छ करण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण कोणतीही कारवाई झाली नाही
आज आपण कुठेतरी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते त्यातून काही काळ सूटका झाली आहे. संकट संपले नाही. तोवर आपल्या गावावर. तालुक्यावर. जिल्ह्यावर. ढेंगू. मलेरिया. काविळ. हिवताप. असे भयानक रोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य असो लहान मोठा. गरीब श्रीमंत. रोगाला काही समजत नाही तो सर्वात समान समजतो. त्यामुळे टाळेबंदी मुळे सर्व सामान्य जनता अजूनही सुरळीत झाली नाही हाताला म्हणावं तसं काम नाही. त्यामुळे आत्ता दवाखान्याचा.दवाखाने. फुल्ल होण्यास सुरुवात झाली आहे औषधांचा खर्च आपणांस कर्जबाजारी करणारं आहे. त्यामुळे आपण आपल्या घराजवळच्या परिसर स्वच्छ ठेवा. मोकळे टायर. भंगार. अस्ताव्यस्त पडलेले सामान आजच हालवा. कारणं या जागेतच डेंग्यूचा मच्छर. पनपतो त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा संडास बाथरुम यांचे सांडपाणी जेथे गोळा होते तेथे. तेल सोडा. उघडे खड्डे झाकून टाका. हे आपल्यालाच करावे लागणार आहे.काही ठिकाणी गटारे नाहीत. शेजारीपाजारी एकामेकाचे सांडपाणी लोकांच्या जागेत गेले तर रोज भांडणे होतात. आपणासच आपले प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. कारणं मतांसाठी येणारे आत्ता नाहीत जरा थांबून येणार आहेत
ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. यांनी पाऊस उघडले बरोबर. मच्छर नाशक औषधे पावडर फवारणी करणे गरजेचे होते. पण फवारणी गावात झाली पण आजूबाजूला जी उपनगर आहेत त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे उपनगरात राहणारया लोकांचे धोक्यात आले आहे. नागरिकांना आपल्या आपल्या विभागासाठी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचेकडे मच्छर नाशक पावडर फवारणी औषध फवारणी करण्यासाठी मागणी करा. अन्यथा आपल्यातून. ठराविक रक्कम काढून आपला आपला परिसर गल्ली आपले घर. औषध फवारणी. पावडर फवारणी करून घ्या.


क्अहमद नबीलाल मुंडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular