Homeवैशिष्ट्येनव्याण स्वातंत्र मागतो आहे मराठा

नव्याण स्वातंत्र मागतो आहे मराठा

ज्यांच्या बापजाद्यानी रक्ताच सिंचन करून हा महाराष्ट्र ऊभारलाय . त्याच मराठ्यांचे आम्ही वंशज आहोत. की आतंकवादी नाही , ना नक्षलवादी , नाही आहोत परग्रहवासी. याच मातीचे सूपूत्र आम्ही संख्येनेही कमी नाही आहोत. इथे डोके मोजणी जरी केली तरी या महाराष्ट्राचा तिसरा हिस्सा आम्ही व्यापलाय. भूतकाळात आणि वर्तमानातही या महाराष्ट्रासाठी झीजलोत आम्ही. आम्हांला वजा करून कूठे दिसतो महाराष्ट्र , कसा दिसतो महाराष्ट्र ही कल्पना तरी शक्य आहे का ? आमच्या विना महाराष्ट्राची.
जेंव्हा देश स्वातंत्र्याची भिक मागत होता तेंव्हा हा सह्याद्री हिमालयाला डोळे दाखवत होता. आम्हीच तर दिली आहे या देशाला स्वातंत्र्याची ओळख. नसता खितपत पडला असता यूगे यूगे पारतंत्र्यात. स्वाभीमाणाच्या पताका वेशीवर गहाण ठेवून , मूजरे घालत. तलवारीच्या पात्यावर ह्या देशाची अस्मीता आम्हीच टिकून ठेवली आहे.
काय गरज होती हो शिव शंभूना ह्या मूर्दाड लोकांत धगधगत्या देशप्रेमाच्या ज्वाला पेरण्यांची. याच राष्ट्रासाठी मरणालाही खूशीन स्विकारलय बाजी-तानाजीन , यसाजी- सूर्याजीन , दत्ताजी-धनाजीन.आजही जगात फिरा ,देशात फिरा या भूमीला मराठ्यांच राज्य म्हणूनच ओळखले जाते. त्याच त्याच मराठयांची काय अवस्था याच महाराष्ट्रत. सर्वस्व देण्याची तयारी सर्वोच्च क्षमता असूनही आरक्षणाच्या गर्तेत संधी नाकारल्या जातायत , म्हणून हाच तो तरूण ज्यांच्या बापजाद्याणी प्राणाच बलीदान देऊन हे राष्ट्र उभारले आहे तोच आज मृत्यूला कवटाळतो आहे. प्रचंड नैराश्यात गुरफटला आहे. हेच का सत्यमेव जयते , सर्व धर्म समभाव , न्यायाच राज्य , म्हनायलाच नूसती लोकशाही. प्रचंड धूसमूस आणि विद्रोहाची ज्वाला शिलगते आहे ईथल्या मराठ्यांच्या मनामनात. हे असेच चालू रहायले तर त्या ज्वालेचा ज्वालामूखी व्हायला वेळ लागणार नाही.

       हा देश हे राष्ट्र स्वातंत्र होऊन आज सत्तर वर्षे लोटली आहेत. इतक्या कालखंडा नंतर ही यथल्या तरूणांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी स्वातंत्र देशात , जेथे कायद्याचं राज्य आहे म्हणे. ज्या देशाच्या घटनेच्या उद्देश पत्रीकेत समान संधी , समान न्याय हा उद्देश असेल तिथेही जिवाचं बलीदान देऊन जर आपल्या १००% न्याय्य मागण्या मान्य होत नसतील तर हाच तो मराठा तरुण ज्यांना पराक्रमाचा बलीदानाचा गौरवशाली इतिहास आहे तो जास्त काळ शांत बसणार नाही . ज्या ज्या वेळी देशात क्रांती घडली आहे , बदलाची सूरवात झाली आहे त्या त्या वेळी देशाला प्रेरणा, दिशा याच महाराष्ट्रान दिली आहे , मराठ्याणी दिली आहे. हा इतीहास विसरून चालणार नाही .आज स्वातंत्र देशात आम्ही स्वातंत्र आहोत का ? हा प्रश्न हा प्रश्न यथल्या मराठ्यांच्या पोरांच्या मणात सलतो आहे. .अन ह्या प्रश्नाचे उत्तरही त्यांना माहीत नाही असे ही नाही . नवी क्रांती , नव्याण स्वातंत्र मागतो आहे यथला मराठा. तेंव्हा सावधान हा देश हे राज्य वाचवायचे असेल तर यथल्या मराठ्यांच्या न्याय्य मागण्या त्यांचा न्याय्य हिस्सा त्यांना मिळायलाच हवा. आता आंधळेपणाने त्यांना गृहीत धरून चालणार नाही . नसता हाच मराठा तरूण स्वातंत्र देशात नव्या स्वातंत्र्य लढ्याची नांदी ठरला नाही तर नवल. नसता व्यवस्था परिवर्तन अटळ आहे . किती काळ किती वर्ष त्यांना प्रवाहा बाहेर ठेवनार आहात. किती वर्षे त्यांना त्यांच्या ताटातला हक्काचा घास हिरावून उपासी ठेवणार आहात. ईतीहासा पासून धडा इथली  पक्षा- पक्षात , खुर्चीच्या लोभापायी धडपडणारी राजकारणी मंडळी घेणार आहे की नाही. जे हरामखोर बापालाच बेईमान झाले आहेत. सर्वस्व देण्याची परंपरा असणारा मराठा समाज त्याचा हक्क आज मागतो आहे . त्यालाच जर तुम्ही भिक समजत असाल तर त्याला दुर्लक्षित करणार असाल तर एक दिवस तूम्हा सर्वांचीच मोळी बांधून त्याची होळी केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही मराठा .
         मराठ्यांवर प्रेम करत असाल तर , आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.. 
  • जगन्नाथ रावसाहेब काकडे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular