Homeक्राईमफेरीवाला परिस्थितीचा बळी

फेरीवाला परिस्थितीचा बळी

आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा शब्द आहे. मागे वळून पाहिले तर डोक्यावर भाजी पाला फळें, खाद्य पदार्थ अशा विविध जीवनावश्यक वस्तू घेऊन विक्री करणारे लोक म्हणजे फिरून जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी व आपली उपजीविका करणारे लोक म्हणजे फेरीवाले. काळ बदलला आणि लोकांच्या अशा आकांक्षा वाढल्या. वाढती लोकसंख्या वाढती वस्तूंची मागणी यामुळे डोक्यावरून फिरून विकणारे फेरीवाले यांचें लोकसंख्या वाढल्यामुळे ज्या त्या गावातच एक जागा निश्चित करून गाडी लावण्यास सुरुवात झाली. त्यात चायनीज , वडापाव आईस्क्रीम , भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस बिर्याणी, भाजी पाला फळें फुले , खेळणी घरगुती सामान अशा एक नाही अनेक वस्तू विक्रीसाठी जागोजागी गाडे लागण्यास सुरुवात झाली. मग त्यात त्या गावातील , शहरातील , जिल्ह्यातील , ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यांची अशा फेरीवाल्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली कारणं असे फेरीवाले रस्त्यावर अतिक्रमण करून आपला व्यवसाय करत असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी तयार होणे , नागरिकांना नाहक त्रास होणे , त्यामुळे अशा फेरीवाल्यांना करांच्या नावाखाली नाहक त्रास देत त्यातच त्या गावातील गाव गुंड यांची दादागिरी वस्तू घेणे त्याचे पैसे न देता अशा गरिब फेरीवाल्यांना माराहान करणे , त्यांच्या वस्तूंची गाड्यांची. तोडफोड करणे असे अनुभव येण्यास सुरुवात झाली. त्यातच गावगुंड यापेक्षा मोठा त्रास होता तो म्हणजे काही ग्रामपंचायत नगरपालिका यामधील बाजार नियोजन करणारे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा अशा फेरीवाल्यांना त्रास देत असतात , पैसे न देता माल घेणे , करापेक्षा जास्त पैसे वसूल करणे , गावच्या ना जागा देणे , परगावाहून पोटासाठी आलेल्या गरिब फेरीवाल्यांना बाजारात बसू न देणे , आपसी दुशमनी काढणे , असा त्रास आपणास आपल्या गावात , तालुका , जिल्हा मिळातो .
रस्त्यावर उभा राहून फिरून वस्तू विकणारे प्राचिन काळापासून आपण ऐकतो वाचतो काळानुसार ढकलगाडी. केबीन रिक्षा. इत्यादी वाहनांचा वापर आज केला जातो. आपण विचार केला तर फेरीवाले समाजाची गरज आहे कारण आपणांस हवी असणारी वस्तू आपल्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम हेच लोक करतात पण त्यांच्याकडे पाहण्याचा शासकीय दृष्टीकोन योग्य नाही. गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव. शिक्षण झाले पण गोरगरीब यांच्या मुलांना. पैश्याच्या अभावी. जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी नोकरी नाही. घरात अठठराविशव दारिद्र्य व्यसनी पालक उन वारा पाऊस थंडी याची काळजी न करता. थोड्या पैशासाठी आपला जीव धोक्यात घालणारे. कोरोना काळात आपण घरात होतो पण भाजीपाला विक्री करणारे रस्त्यावर होतें आपली गैरसोय टाळण्यासाठी म्हणून अशे गरिब घरातील मुल आपला व आपल्या कुटुंबांला आपली मदत व्हावी यासाठी रस्त्यावर कमी भांडवलात एकादा व्यवसाय सुरू करतात पण समाजांचा शासनाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गरिब रस्त्यावर अडथळा वाहतुकीला अडथळा म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते. आणि यातून अशा फेरीवाल्यांचयावर झालेल्या अन्याय त्यांना अतिक्रमण नावाखाली व अन्य कारणांमुळे रस्त्यावरून हालविले जाते. हातचे चालू असणारे व्यवसाय गेल्यामुळे हीच मुल गुन्हेगारी कडे वळतात आणि यातून व्यसन. अपहरण. चोरी. खून मारामाऱ्या. तस्करी असे एक नाही अनेक विघातक वळणाकडे मुल वाळतात आणि उद्याचे आपल्या देशांचे भविष्य असणारी तरूण पिढी नष्ट करण्यास शासन जबाबदार आहे असे म्हणले तर वावगं ठरणार नाही. एकीकडे रस्त्यावर गरजेपेक्षा धावणारया गाड्या चार चाकी दोन चाकी सायकल यामुळे गर्दि होत नाही कां ? त्यामुळे गर्दि होते त्याला कायद्यात फसविण्याचा प्रयत्न शासन करतंय. चांगली नोकरी मिळावी आणि संसार सुखाचा करावा व्हावा. मुल चांगल्या शाळेत शिकावी. आपले आई वडील यांचे आपण चांगल्या प्रकारे पालनपोषण करता यावे असे तरूणांना वाटते. पण सर्वांना नोकरी देण्यासाठी शासनाकडे तरतूद नाही. आज एम पी सी स्पर्धा परीक्षा पास होऊन. रात्र दिवस व्यायाम अभ्यास. स्पर्धा परीक्षा वर्ग बेमाफि फि. कोणतीही भरती नाही. चांगली नोकरी नाही आणि शासन नियोजन करू शकत नाही म्हणजे या सर्व प्रकाराला शासन जबाबदार आहे. एखादा मोठा व्यवसाय उद्योग धंदा उभा करावा त्यासाठी भांडवल नाही. विविध कल्याणकारी आर्थिक योजना. विना तारण विना जामीन लहान उद्योग करण्यासाठी आर्थिक योजना आहेत पण बॅंका सुध्दा या गरिबांना कोणतीही बॅंक कर्ज देत नाही. असे कर्ज फक्त नेत्यांच्या बगलबचयाना मिळते नाही तर मॅनेजर यांना कमिशन दिल्याशिवाय कर्ज प्रकरण मंजूर होत नाही मग या गोरगरीब मुलांना कोठेच रस्ता न दिसल्यामुळे तरुण अवैध धंदे शोधने किंवा हा सर्व प्रकार डोक्याला झेपला नाही म्हणून आत्महत्या सारखें मार्ग निवडले जातात आणि आपली जीवनयात्रा संपवली. एकंदरीत प्रस्थिती पाहता तुटपुंज्या भांडवलात व अधिक कष्टात प्रामाणिकपणे जगण्याचा मार्ग म्हणून अनेकजण फेरीवाले बनतात आणि चुकीच्या मार्गाला लागण्यापूर्वीच तरूणांची मुक्ति होते. समाज व्यवस्था टिकविण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणूनच समाजाने व शासकीय अधिकारांची माणुसकीच्या दृष्टीकोनातून फेरीवाले यांचेकडे पाहिले पाहिजे. आपल्या हक्कासाठी संघटना उभारल्या आहेत संघटित ताकतीवर अनेकवेळा पोलिस अन्याय आणि शासकीय अधिकाराच्या मनमानी धोरणाला त्यांनी तोंड दिले परंतु हे नेहमीच त्यांना जमलेच नाही. यांच्या संघटनेचा राजकीय पक्षानी फायदा घेतला वरवरची आश्वासने देऊन बहुसंख्य वेळा अतिक्रमणाच्या नावाखाली मालाची नासाधुस गुंड यांचेकडून हप्ता वसूली. आणि पोलिसांकडून हडेलहप्पी असा अन्याय हे फेरीवाले निमुटपणे सहन करताना दिसतात.
‌ अखेर सर्व प्रकार शासनाच्या ध्यानात आला आणि शासनाने फेरीवाले सुरक्षा कायदा २०१२ मंजूर केला या कायद्यानुसार पूर्वीच्या फेरीवाल्यांना आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले व्यवसाय करण्यासाठी संरक्षण मिळाले. भारतीय घटनेने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. या कायद्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करून मानाने जगण्याचा एक मार्ग तरुणांसमोर उपलब्ध झाला. आत्ता या कायद्याची अंमलबजावणी प्रकक्षाने व्हावी तसेच आपल्या अडचणींना व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर या आपला अधिकार हिरावून घ्यावा लागणार आहे शासनाने भरती प्रक्रिया सुरू करा. त्यामुळे नोकरी मिळेल गोरगरीब मुलांना नोकरी द्या बेरोजगारी नष्ट करण्यासाठी लोकांच्या साठी कल्याणकारी आर्थिक योजना राष्ट्रीय कृत बॅंकांना कर्ज प्रकरण मंजूर करणे बंधनकारक करा
फेरीवाला परिस्थितीचा बळी आहे.

  • अहमद नबीलाल मुंडे
  • तुम्ही असे प्रकार कधी अनुभवले आहात का असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्कीच share करा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular