Homeघडामोडीआजरा आगराला रक्षा बंधनाच्या शुभमुहूर्तावर लालपरिंची भेट पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश

आजरा आगराला रक्षा बंधनाच्या शुभमुहूर्तावर लालपरिंची भेट पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश

आजरा (हसन तकीलदार) :-मागील वर्षापासून आजरा आगाराला लालपरीची कमतरता भासत होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. याचा परिणामवश आगार अधिकाऱ्यांना प्रवाश्यांच्या रोषाला बळी पडावे लागत होते. आजऱ्यातील काही संघटना व प्रवाश्यांच्या मागणीचा विचार करून त्याचा पाठपुरावा करीत राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रक्षा बंधनाच्या शुभ मुहूर्तावर आणखीन पाच लालपऱ्या आजरा आगाराला हजर झाल्या. त्या पाच बसेसचे आज उपस्थित मान्यवारांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

अनेक दिवसापासून आजरा आगाराला नवीन बसेसची आवश्यकता होती. बसेसच्या कमतरतेमुळे आजरा आगाराला काही वेळा अचानक काही बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या त्यामुळे खेडेगावातील प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत होते. यासाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती, प्रवासी संघटना तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आजरा एस. टी.डेपोला नवीन बसेस देण्याची मागणी केली होती. या मागणीस अनुसरून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर आणखीन पाच लालपऱ्या प्रवाश्यांच्या सेवेत रुजू झाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या लालपऱ्यांचे पूजन करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना विजय थोरवत म्हणाले की, आम्ही दहा बसेसची मागणी केली होती त्यानुसार 18/05/2025रोजी पाच बसेस पुरवण्यात आल्या होत्या आणि उर्वरित पाच बसेस आज दिल्या त्याबद्दल मी मंत्रीमहोदयांचे अभिनंदन करतो. तर इंद्रजित देसाई (वेळवट्टी)यांनीही नाम. आबिटकर व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

यावेळी परशुराम बामणे,संजय पाटील (भादवण), अनिकेत चराटी, सुधीर कुंभार, संतोष भाटले, नाथ देसाई, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, गौरव देशपांडे, विजय कोंडूसकर, हरीश हरमळकर, सचिन इंदूलकर, पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण, युवराज पाटील(गवसे), मारुती डोंगरे, मंदार बिरजे, राहुल नाईक, शंतनू पाटील, हृतिक बिरजे, सार्थक कुंभार, दयानंद निऊंगरे, सुनील दिवेकर, काकासो देसाई, अभिजित रांगणेकर, महेश दळवी तसेच आजरा आगाराचे अधिकारी, कर्मचारी आदिजण उपस्थित होते.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular