Homeवैशिष्ट्येभाग ३० लोकांची देण्यामागची प्रेरणा

भाग ३० लोकांची देण्यामागची प्रेरणा

भाग ३०
लोकांची देण्यामागची प्रेरणा

लोक मदत का करत नाहीत?
▶️ घर खर्च कुटुंबाच्या गरजा यांना प्राधान्य देणे आवश्यक असत.
▶️ कमवण्याचं साधन स्वतःकडे नसत.
▶️ हा अतिरिक्त खर्चाचा/ देणगीचा भार पेलत नाही.
▶️ देणगीसाठी कोणी विचारलच नाही म्हणून
▶️ इतरांकडून न देण्यासाठीची जबरदस्ती होते म्हणून
▶️ संस्थेच्या कामाबाबत किंवा त्या सामाजिक प्रश्नाबाबत आस्था, आत्मीयता वाटत नाही म्हणून
▶️ आधीच्या कटू अनुभवामुळे

सरकारी संस्थांची मदत देण्यामागची प्रेरणा
▶️ स्वयंसेवी संस्थांना त्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत म्हणून
▶️ सरकारला ज्या लोकांपर्यत पोहचता येत नाही त्यांच्यापर्यंत स्वयंसेवी संस्थाच्यामार्फत पोहचता यावे म्हणून
▶️ संस्थेच्या उद्दिष्टातून सरकारी धोरणे/ नियोजन साध्य व्हावे म्हणून

निधीदाते व फौंडेशनची मदत देण्यामागची प्रेरणा
▶️ ज्या उद्दिष्टासाठी संस्थेची स्थापना झाली आहे ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
▶️ समाजसुधारणा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य लोकांना मिळावे यासाठी
▶️ काही कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी

ह्याबद्दल देणाऱ्याच्या काय अपेक्षा/ भावना असतात.
▶️ ताबोडतोब पोच पावती/कृतज्ञता
▶️ आपल्या मदतीचा कशासाठी विनियोग व कसा करावयाचा आहे/केलेला आहे. ह्या संबंधी दात्या व्यक्तीशी केलेला लेखी संवाद
▶️ समाजात ओळख मिळावी, मन मिळावा.
▶️ आपण जे दिल त्यातून काही विशिष्ट गोष्टी साध्य व्हाव्यात.
▶️ एका चांगल्या सामाजिक कार्याचा भाग झाल्याचे मानसिक समाधान
▶️ प्रसिद्धी मिळावी.

देणगी मिळण्यायोग्य संधी
▶️ संस्थेचे नवीन उपक्रम- उन्हाळी कॅम्प, उन्हाळी शैक्षणिक शिबिरे इत्यादी.
▶️ वर्तमानपत्रातून संस्थेविषयी काही चांगल्या बातम्या
▶️ संस्थेचा वार्षिक वर्धापन दिन
▶️ सुट्टी
▶️ संस्थेचे वार्तापत्र व वार्षिक अहवाल?
▶️ संस्थेच्या एखाद्या मोठ्या उपक्रमाचा शुभारंभ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular