पाॅवर पाॅईट प्रेझेंटेशन म्हणजेच एल.सी.डी. प्रोजेक्टर किंवा स्लाईड प्रोजेक्टरच्या आधारे सादरीकरण खरतर, ही उपकरण हा सादरीकरणातला आधार किंवा दृकश्राव्य गोष्टींचे माध्यम म्हणून उपयोगी ठरतात. पण खरी भिस्त असते ती वक्ता या उपकरणांच्या सहाय्याने विषयाची मांडणी कशी करतो/करते यावर त्यामुळे अशा प्रकारच्या सादरीकरणासाठी वक्त्याने हरतऱ्हेची कसून तयारी करायला हवी, सराव करायला हवा. आवश्यक त्या परिश्रम आणि सरावानंतर “सादरीकरण” अजिबात अवघड नाही.
सादरीकरणाचा तीन पायऱ्यांमध्ये विचार करता येईल :
१) सादरीकरणापुर्वी तयारी
२) संगणकावर सादरीकरण तयार करणे.
३) प्रत्यक्ष सादरीकरण करणे.
या तिन्ही पायऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात, कशाचे भान राखायला हवे ते थोडक्यात पाहू…
१) सादरीकरणापूर्वीची तयारी : याचेही २ भागात विभागणी करता येईल.
अ) विचारातील स्पष्टता ब) आवश्यक साहित्याची, माहितीची जमवाजमव.
अ) विचारातील स्पष्टता –
१) उद्देश – एखाद्या विषयाचे सादरीकरण आपण का करतोय, त्यातून काय साध्य करायचंय, त्याची गरज काय, श्रोत्यांची/प्रेक्षकांची अपेक्षा काय याचा अभ्यास करायला हवा.
२) सादरीकरण पद्धत : या विषयाच्या मांडणीसाठी पाॅवरपाॅईट प्रेझेंटेशन हेच उत्तम माध्यम आहे कि इतर कोणते प्रभावी माध्यम असू शकते. याचा विचार व्हायला हवा.
३) दृकश्राव्य माध्यम : या प्रकारच्या सादरीकरणाकडे दृकश्राव्य मांडणीचे माध्यम म्हणून पहिले जाते. त्यामुळे तसे दृकश्राव्य साहित्य ज्यातून विषय अधिक स्पष्ट आणि सोपा करण्यास मदत होईल असे उपलब्ध आहे न किंवा मिळवता येईल न याचाही विचार व्हायला हवा.
४) प्रेक्षक व त्यांच्या अपेक्षांची माहिती – ज्यांच्यासमोर सादरीकरण करायचे त्यांची ऐकण्याची क्षमता, ज्ञानाची सर्वसाधारण पातळी, त्यांची विषयाची समज आणि त्यांना आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांची पक्की माहिती वक्ता म्हणून आपल्याला असायला हवी. सर्व गोष्टींची सांगड आपल्या सादरिकरणाशी घालता यायला हवी.
ब) आवश्यक साहित्य व माहितीची जमवाजमव –
१) विषयाचे सखोल ज्ञान : यासाठी त्या विषयाचे भरपूर वाचण असणे, छोट्या-छोट्या घटकांची कारणीमासा करता येणे आणि अद्यावत माहिती जमवलेली असणे आवश्यक आहे.
२) सविस्तर नोट्स बनिवणे : प्रत्यक्ष पाॅवर पाॅईट प्रेझेंटेशन बनवण्यापूर्वी त्या विषयाची नोट तयार केली तर विषयाची स्पष्टता येतेच शिवाय, सादरीकरण संदर्भ म्हणूनही त्याचा उपयोग करता येतो.
३) इमेजेस, फोटो, क्लिप-आर्ट, चित्र यांची जमवाजमव : लक्षात घ्या कि हे एक दृकश्राव्य माध्यम आहे. या अनुषंगाने अशा गोष्टीच्या योग्य वापराने खूप चांगला परिणाम साधता येतो. एखाद्या मोठ्या वाक्यातला अर्थ एखाद्या छोट्याशा चित्रातून पटकन लक्षात येऊ शकतो.
४) सादरीकरणाची रूपरेषा ठरवणे : शक्यतोवर महत्वाच्या मुद्यांचे एकत्रीकरण करून ही रूपरेषा ठरवता येते, याची आणखी साधारणपणे अशी असावी:-
१) सुरुवात – १ स्लाईड
२) सादरीकरणाची रूपरेषा – १ स्लाईड
३) विषयाची मांडणी – साधारणपणे ८ ते १० स्लाईड
( प्रेक्षकांच्या एकाग्रतेच्या कालावधीला अनुसरून )
४)संपर्क शेवट – सूचना/साध्य केलेले यश/ भविष्याचा आराखडा १ ते २ स्लाईड
५)आभार/ एखादा अनुरूप सुविचार
२) संगणकावर सादरीकरण सादर करणे – यासाठी संगणकाची Functions)अशी असावीत.
१) Start Menu मधून MS Power Point घ्यावा.
२) स्लाईडच्या Layout आणि Design ठरवावे.
३) आपण तयार केलेल्या नोट्स Bullet Points च्या रूपातून मांडाव्यात.
४) सादरीकरानाची रूपरेषा ठरवून ती दुसऱ्या स्लाईडमध्ये मांडावी व हीच रूपरेषा संपूर्ण सादरीकरणात कायम ठेवावी.
५) सादरीकरण बनवून संपवण्यापूर्वी Spelling. ऱ्हस्व, दीर्घ आणि व्याकरणाच्या चुका नाहीत ना याची खात्री करावी.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक