Homeबिझनेसभाग ६०- प्रभावी संवादातील महत्वाचे पैलू / घटक

भाग ६०- प्रभावी संवादातील महत्वाचे पैलू / घटक

“प्रतिसाद” हा असा असणे फारच हितावह !!
१. वर्णनात्मक : एकमेकांच्या अनुभवातून काही शिकवणारा असावा स्वरक्षणार्थ केलेला नसावा.
२. ठोस असावा : आत्मविश्वासपूर्व मांडणी व एखादे वर्तन जे सर्वसामान्य वर्तनात बसत नाही.
३. रचनात्मक व ताळमेळ साधून केलेला आसावा ऐकणाऱ्याची क्षमता व त्याच्या गरजा ह्यांचेही पुरेपूर विचार करून दिलेला असावा.
४. उपयुक्त : “वर्तन बदलावास” पूरक व उपयुक्त असावा. योग्य वेळेत दिलेला प्रतिसाद हा वर्तन सुधारण्यास उपयुक्त ठरतो.
५. प्रभावी प्रतिसाद हा ऐकणाऱ्याने नीट ऐकला तरच प्रभावी ठरू शकतो.

तपासणी व चाचपणी :
सांगणाऱ्याने व ऐकणाऱ्या मध्ये ताळमेळ असावा. संदेश व हिताची प्रक्रिया तपासून पहावी ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे ऐकणाऱ्याने आपल्याला कळलेला संदेश/माहिती सांगणाऱ्याला परत ऐकावा/ऐकावी सांगावी जेणे करून योग्य संदेशाची खातर जमा करता येईल. त्यामुळे गैर समजुतीस वाव रहात नाहीत.

प्रतिसादात्मक माहितीमध्ये (Feedback information)
१) मध्ये काय सांगायचे व शब्दव्यतिरिक्त असलेले संकेत फार महत्वाचे असतात उदा., आवाजाचा टोन, देहबोली हालचाल ह्या सर्व गोष्टी संदेशवहनात महत्वाचा असतात.
२) प्रतिसाद ऐकणाऱ्याने पाहायचे महत्वाचे पथ्य म्हणजे शांतपणे ऐकणे व लागलीच प्रती प्रश्न न करणे स्वसंरक्षणार्थ मुद्दे मांडायचे व गती उत्साहाच्या भारत टाळणे व प्रतिक्रिया/ प्रतिसाद नीट आकलन.
३) जर संस्थेतील टीम खुली मोकळी असेल व एकमेकांतप्रती विश्वास असेल व सर्वात महत्वाचे म्हणजे बदलाला सामोरी जाणारी व बदल स्वीकारण्याची मानसिकता असलेली असायला हवी.
४) मदत करण्याच्या पुढे जाऊन “प्रतिसाद” हा विचारांना चालना देणारा प्रोत्साहन देणारा असतो. संस्थेतील नेतृत्व व संस्थाप्रमुख हा सतत संस्थेचे काम व प्रगती ध्येय धोरणानुसार चालते आहे कि नाही निश्चित करीत असते.
सुधारात्मक प्रतिसाद म्हणजे संस्थेतील महत्वाची व्यक्ती जेव्हा टीममधील एखादा/सभासद ठराविक गोष्ट करण्यामागचे ध्येय/कारण समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतो.

सुधारात्मक प्रतिसाद :
१. अतिशय काळजीपूर्वक मांडणी केल्यास व ज्याकडे व्यक्त करावयाचे आहे त्याचा विचार करून दिलेला असतो.
२. हा संस्थेच्या अंतिम ध्येय धोरणाला धरून सुसंगत असावा.
३. हा थोडक्यात व थेट असावा.
४. हा एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तिगत स्वभावाला धरून नसावा तर वर्तनाला धरून असावा.
५. हा नीट समजून थांबून सांगावा नाहीतर ऐकणाऱ्यास तो समजणे व आकलन करणे कठीण होईल.
६. टीममधील एखाद्या सदस्याला तिचे/त्याचे मत व्यक्त करण्यास संधी देणारा असावा.
७. टीममधील सदस्यास ठराविक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य पर्याय शोधण्याची संधी देणारा असावा.
प्रतिसाद देणे म्हणजे एखाद्या व्यक्तीस बदलणे नव्हे पण तुम्हास भावले जाणलेले व्यक्त करणे होय.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular