Homeबिझनेसभाग ६२- पाॅवर पाॅईट प्रेझेंटेशन….एक कला आणि शास्त्र !

भाग ६२- पाॅवर पाॅईट प्रेझेंटेशन….एक कला आणि शास्त्र !

सादरीकरण बनवताना या बाबी ध्यानात असू द्या…


▶️ कमीत कमी शब्दात अधिकाधिक अर्थ असावा.
▶️ थोडक्यात पण स्पष्ट मांडणी असावी.
▶️ संपूर्ण वाक्य न लिहिता स्लाईडवर फक्त मुद्दे मांडावेत व बाकीचे विश्लेषण तोंडी सांगावे, संपूर्ण परिच्छेद लिहिणे टाळावे.
▶️ एका स्लाईडमध्ये जास्तीत जास्त ४ ते ५ मुद्दे असावेत.
▶️ दोन मुद्द्यांमध्ये योग्य तेवढी जागा सोडलेली असावी.
▶️ फिकी पण आकर्षक Background निवडावी MS Power Point मध्ये MS Power Points आहेत. अतिगडद Background वापरल्यास ती अंगावर आल्यासारखी वाटते.
▶️ वाचनीय अशी रंगसंगती निवडावी एका वेळी २ ते ३ विविध पण एकमेकांना अनुरूप अशा रंगांचा वापर करावा.
▶️ लिखित शब्दांचा रंग शक्यतोवर पार्श्वभूमीच्या रंगाला विरुद्ध पण अनुरूप असावा किंवा एखादा मुद्दा रंगाच्या फिकी-गडद अशा छटा असाव्यात.
▶️ Font चा रंग एखादा मुद्दा अधोरेखित करण्याच्या उद्देशानेच बदलावा उगाच कारण नसताना विविध रंग वापरू नयेत.
▶️ सर्व स्लाईडमध्ये एकसूत्रीपणा असावा.
▶️ या सर्व बाबी ठरवताना सादरीकरणाच्या सभागृहाची लांबी, क्षमता इ. गोष्टी देखील ध्यानात ठेवाव्यात.
▶️ शक्यतोवर सर्वसाधारणपणे उपलब्ध आणि प्रचलित असे Font वापरावेत. Stylish Font मुळे लक्ष विचलित होतेच शिवाय रस जाऊ शकतो.
▶️ शक्यतोवर एकावेळी एकच मुद्दा सादर करावा, जेनेकरून प्रेक्षकांचे लक्ष आपण काय सांगतोय यावर केंद्रित रहाते.
▶️ Animations चा संयुक्तिक वापर करावा. विचित्र प्रकारे हलणारे शब्द प्रेक्षकांची एकाग्रता भंग करतातच शिवाय, विषयाचे गांभीर्यही कमी करतात.
▶️ स्लाईड नंबर, तारीख आणि Footer यांचाही योग्य वापर करता येऊ शकतो.
▶️ एखादी छोटी Film किंवा Audio Clipping चा देखील यात समावेश करता येऊ शकतो. यासाठी Main Menu मधील Insert मध्ये Movies and Sounds या Option मध्ये जाऊन योग्य ती file निवडून आपल्या सादरीकरणात त्याचा अंतर्भाव करता येऊ शकतो.
▶️ योग्य ठिकाणी Table आणि Graphs चा वापर जरूर करावा. परंतु, तसे करताना खालील गोष्टी – लक्षात ठेवायला हव्यात :-

  • Table आणि Graphs यांना समर्पक नावे द्यावीत.
  • त्यांची मांडणी थोडक्यात अधिक माहिती पुरविणारी असावी.
  • Graph वापरताना त्याची सूची आणि रंगसंगती संपूर्ण माहिती पुरवणारी आणि व्यवस्थित दिसेल अशी असावी.
    इतक्या गोष्टींची काळजी घेऊन तयार केलेल्या पाॅवर पाॅईट प्रेझेंटेशनचं सादरीकरण कसं करायचं तर आता पाहूया… ३)प्रत्यक्ष सादरीकरण करणे :-
    १) पेहराव – प्रेक्षकांची पार्श्वभूमी, विषयांचे गांभीर्य, स्वतःचा आत्मविश्वास, सुटसुटीतपणा या गोष्टींचा विचार करून पेहरावाची निवड करावी. भडक मेकअप किंवा भडक रंगाचे, घट्ट कपडे टाळून स्वता:च्या व्यक्तिमत्वाला साजेसा पेहरावा उठावदार दिसू शकेल.
    २) आवाजातील चढ-उतार योग्य पद्धतीने केल्यास सादरीकरण कंटाळवाणे होत नाही.
    ३) प्रसंगावधान राखणे नेहमीच फायदाचे ठरते.
    ४) स्लाईडसचे वाचन टाळावे त्याएवजी प्रत्येक मुद्दा स्पष्ट करण्यावर भर द्यावा.
    ५) आवश्यकता असल्यास Pointers चा वापर करणे चांगले.
    ६) खोलीतील प्रकाश व्यवस्था – वक्त्याला प्रेक्षक दिसायला हवेत जेणेकरून संवाद साधने सोपे जाते परंतु स्लाईडसची स्पष्टता देखील कायम राहील इतका अंधार हवा.
    ७) स्लाईड दाखवल्यानंतर जर ती प्रेक्षकांनी वाचावी (उदा.ग्राफ) असे अपेक्षित असेल तर ती किमान १०-१५ सेकंद काहीही न बोलता समोर राहू द्यावी.
    ८) शक्यतोवर प्रेक्षकांना पाठ दाखवू नये किंवा आपण स्वतः प्रोजेक्टरच्या मध्ये येत नाही न याची काळजी घ्यावी.
    ९) शक्य असल्यास Laptop आपल्यासमोर संदर्भासाठी असावा किंवा आपल्या नोटसचे छापील कागद हातात ठेवता येतील परंतु, पडद्यावरची Slide वाचून सांगण्याने चांगला प्रभाव पडत नाही न याची काळजी घ्यावी.
    १०) Laptop आणि Projector कसा वापरायचा हे शिकून घेणे उत्तम पण तरीही आयत्यावेळी गोंधळ होऊ नये म्हणून रंगीत तालीम करावी आणि गोंधळ झालाच तरी आत्मविश्वास ढासळू देऊ नये.
    ११) आपले सादरीकरण “लाखात एक” असा तोडीच होईल यासाठी तशी तयारी आणि सराव उपयोगी पडतोच, पण काहीतरी जगावेगळ करण्याच्या प्रयत्नात साधेपणा स्पष्टता आणि तर्कशुद्धता घालवू नये.
    १२) सादरीकरण वेळेतच संपायला हवे. अथवा प्रेक्षकांना एकाग्रतेच्या क्षमतेबाहेर गेल्यास आपलेच परिश्रम वाया जाऊ शकतात.

▶️ योग्य ठिकाणी विनोदबुद्धीचा वापर जरूर करा.
▶️ सादरीकरणाच्या शेवटी थोडक्यात सर मांडायला विसरू नका.
▶️ जितकी प्रभावी सुरुवात तितकाच शेवट- सादरीकरणातून किमान एक Take Home Message तुमच्या प्रेक्षकांना जरूर द्या.
▶️ प्रश्नोतरे, चर्चा यासाठी काही मिनिटांचा अवधी नियीजीत करा.
▶️ प्रश्नोत्तरांच्यावेळी एखादे समर्पक चित्र/इमेज/फोटो स्लाईडवर दाखवल्यास प्रभावी ठरू शकेल.

लक्षात असू द्या… लोक तुमची मांडणी ऐकण्यासाठी आलेले आहेत केवळ स्लाईडस वाचवण्यासाठी नाही…तेव्हा भरपूर सराव केला तर बाजी मारण अवघड नाही…!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular