Homeघडामोडीमा. हसन मुश्रीफ फौंडेशनचा भाजप वतीने जाहीर निषेध.

मा. हसन मुश्रीफ फौंडेशनचा भाजप वतीने जाहीर निषेध.

आजरा ( अमित गुरव) –

भारतीय जनता पार्टी आजरा यांच्या वतीने मा. हसन सो मुश्रीफ फाऊंडेशन कागल यांच्या पूर्व माध्यमिक परीक्षा ई. ८ वी बुध्दीमत्ता या विषयातील सराव चाचणी पेपर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून देशातील समस्त शिवप्रेमी च्या भावना दुखावल्या गेल्या; याबद्दल आज भारतीय जनता पार्टी, आजरा कडून आजरा मध्ये सदर मुद्दाम हून घडविलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच त्या दोषींवर कारवाई व्हावी म्हणून दि.२० रोजी सहायक पोलिस निरीक्षक तसेच तहसीलदार आजरा यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार, उदय चव्हाण, सचिन इंदलकर, अजित हारेर, उदयराज चव्हाण, रामदास मिसाळ , सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपतींचा उल्लेख एकेरी, आणि कासीम चा उल्लेख कासिमभाई. वाह रे वा. मा. हसन मुश्रीफ फौंडेशन चा जाहीर निषेध. समस्त हिंदू आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम जाणून बुजून केलेले आहे… या गोष्टींचा जाहीर निषेध. झाल्या प्रकारची जाहीर माफी संबंधित लोकांनी मागायलाच हवी.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular