गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळावे. व त्यांचा अन्न धान्याची गरज मिटावी यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रास्त भावात सवलतीच्या दरात अन्न धान्य पुरविण्याची योजना १ जून १९९७ पासून अंमलात आणली. त्यानंतर तिहेरी शिधापत्रिका योजना १ मे १९९९ पासून राबविण्यात आली. आय आर डि पी. च्या १९९७ /१९९८ या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न . १५००० निश्चित करण्यात आले होते. अंत्योदय अन्न योजना १ मे २००१ मध्ये राबवण्यासाठी शासनाने तत्परता दाखवली. यानंतर ९/९/२००८ अन्वये राज्यातील विडी कामगार, पारधी, कोल्हाटी, या मागास प्रवर्गासाठी व कुटुंबासाठी शासन निर्णय. २९/९/२००८/१२/२/२००९ अन्वये समाजातील. विधवा महिलांसाठी. परित्यक्ता, निराधार अशा विविध घटकांसाठी बी पी एल शिधापत्रिका. १७/१/२०११ चे शासन निर्णयात गोरगरीब मागास यांना न्याय व हक्काचे अन्न धान्य मिळण्यासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली १७/३/२००९ अन्वये राज्यात कामगारांनी आपल्या हक्क व अधिकार यासाठी संप केला आणि त्यांचे पडसाद म्हणून विविध कापड गिरण्या, सुत गिरण्या, साखर कारखाने, यामधील कामगारांना त्याची अन्न धान्य याची गरज भागावी यासाठी शासनाने पिवळी शिधापत्रिका याचा तात्पुरता लाभ देणयाचा निर्णय घेतला.
शासन विविध माध्यमातून सर्वसामान्य जनता जगविण्यासाठी प्रयत्न करत आहे पण काही सामाजिक समाज कंठक यांना रेशन दुकान मंजूर झाले होते ते तो कोणत्या ना कोणत्या शासन अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून मंजूरी दिली जाते मग काय या दुकानाचा उपयोग पैसा मिळविण्याचे साधन म्हणून केला जातो. मग विविध कारणे सांगून गोरगरीब जनतेचा हक्क मारला जातो. आपण शिधापत्रिका धारक आहोत त्याप्रमाणे आपणांस विशिष्ट हकक व अधिकार दिले आहेत
(१) काही कारणास्तव आपले अन्न धान्य चालू महिन्यात आपण आणू शकलो नाही तरी घाबरायचे कारण नाही तोच अन्न धान्य आपण पुढच्या महिन्यात सुध्दा आणू शकतो
(२) बी पी एल व अंत्योदय अन्न धान्य महिन्यात केंव्हाही चार हप्त्यात आणू शकतो
(३)! रेशन खरेदी करताना आपण घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. त्यावर रेशन दुकानाचा नंबर असणे गरजेचे आहे
(४) एकाच दिवशी एकच पावती फाटली पाहिजे असा कोणताही नियम नाही. म्हणजे. आपण रेशन रेशन अन्न धान्य आणायला गेला काही कारणास्तव म्हणजे पैसे कमी पडले आणि आपण त्याच दिवशी सकाळी सोडून संध्याकाळी रेशन आणायला गेलो तर रेशन दुकानदार एका दिवशी दुसरी पावती फाडता येणार नाही असे सांगता येणार नाही
पावती
(५) रेशन आणताना आपणास जेवढ्या वस्तू पाहिजेत तेवढ्या वस्तू आपण खरेदी करू शकतो
(६) राॅकेल मिळणार नाही असे रेशन दुकानदार सांगू शकत नाही
(७) शिधापत्रिका सवताकडे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदारांना नाही
(८) रेशन दुकान रोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार वाजता चालू ठेवले पाहिजे असा नियम आहे
(९) आठवडा बाजार दिवशी रेशन दुकान उघडणे बंधनकारक आहे.
(१०) रेशन दुकान एका दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद असेल तर ग्राहक त्या दुकानांचा फोटो काढून वरिष्ठांकडे तक्रार दाखल करू शकतो
(११) रेशन दुकानात. स्पष्ट दिसेल असे वाचता येईल असे. माहिती फलक / सुट्टीचा दिवस / दुकान नंबर/ तक्रार वही / रेशन कार्यालयाचा पत्ता / फोन नंबर/ रेशन कार्ड संख्या /बी पी एल कार्ड संख्या दुकानांत लावलेली असावी /
(११) रेशन दुकानदार. धमकी / धाक / दांडगेशाही. / करत असेल नाहक न पटणारी कारणें सांगत असेल तर ग्राहक तक्रार दाखल करू शकतो
(१२) आपली तक्रार लिहून त्याखाली नाव/ पत्ता / सही / अंगठा / अशी पूर्तता करून दाखल करावा
(१३) आपल्या गावात आपण रेशन घेतो पण रेशन दुकानदार आपणास आपल्या रेशन मालाची पावती दिली जात नाही
(१४) तक्रार वही न देणें अदखलपात्र गुन्हा आहे
(१५) ग्रामीण भागात ग्रामपंचायत दक्षता समिती नेमू शकते या समितीचा सदस्य सचिव तलाठी असतो. ही समिती रेशन दुकानदारांवर धाड टाकणे. वेळ पडल्यास टाळे लावू शकते
(१६) रेशन दुकानदारांच्या तक्रार वहित पाच किंवा त्यापेक्षा जास्त तक्रारी नोद झाल्यास रेशन दुकानदाराला १५ हजार दंड होऊ शकतो
आज आपणांस समजदार होणे जागृत होणे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहणे. चोरांना चाफ लावण्यासाठी एकत्र येऊन. रेशन हक्क आहे माझा त्यावर कोणत्याही समाजकंटकांचा अधिकार नाही. आपले कोणतेही प्रकरणं संबंधित पुरवठा विभागात प्रलंबित असल्यास चौकशी करा. का ? कशासाठी ? काय म्हणून ? याची विचारणा करा. आपल्या व प्रलंबित प्रकरणासाठी अधिकार व कर्मचारी यांनी काही आर्थिक मागणी केल्यास संबधिता विरोधात जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा.
- अहमद नबीलाल मुंडे
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मुख्यसंपादक