चला इतिहास वाचूया
मावळ्याचे नाव :- विसाजी बल्लाळ
जन्म :- अज्ञात
मृत्यू :- २४ फेब्रुवारी १६७४
इतिहास :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असायचा… महाराजांच्या सैन्यात एक असामान्य शिपाईगडी म्हणून काम करणारे विसाजी बल्लाळ हे होते.. महाराजांबद्दल असणारे प्रेम, दुर्दम्य विश्वास पराकोटीची स्वामीनिष्ठा हे गुण त्यांच्या अंगी होते…. महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले विसाजी बल्लाळ सुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही.
लढाई :-बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने रयतेवरअन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.
मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मराठ्यांना शरण आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठमराठ्याने त्याला धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.
प्रतापराव गुजर आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांच्यातील युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. प्रतापराव यांनी बहलोलखान याचा पराभव केल्यानंतरही त्याला जीवदान दिले होते. तेव्हा ‘बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’असा निरोप छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना पाठविला. महाराजांचा आदेश मिळताच प्रतापराव आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी बहलोलखानच्या बारा हजार सैन्यावर चाल केली. यात त्यांना आणि सर्व सरदारांना वीरगती प्राप्त झाली होती. कोल्हापूरजवळील नेसरी येथे झालेल्या या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासह या वीरांमध्ये विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव विठ्ठल, पीळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोबा यांचा समावेश होता.
समाधी स्थळ :-
कोल्हापूर जवळील नेसरी ता- गडहिंग्लज येथे बहलोलखान व हे सात मराठे सरदार यांच्यात लढाई झाली आणि त्यामध्ये या सात वीरांना वीरगती प्राप्त झाली.. याची आठवण म्हणून याच ठिकाणी या सातही वीरांची समाधी बांधली होती…
- शिवविचारप्रतिष्ठान
मुख्यसंपादक