Homeघडामोडी"शिक्षणाला दिशा देणारे हात – शिक्षकांचे, पण बळ देणारे – पालकांचे !"

“शिक्षणाला दिशा देणारे हात – शिक्षकांचे, पण बळ देणारे – पालकांचे !”

आजरा ( अमित गुरव ) –”सध्याच्या बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रक्रिया केवळ शिक्षकांपुरती मर्यादित राहिलेली नसून त्यात पालकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे,” असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी व्यक्त केले.

विद्या मंदिर रायवाडा येथे पार पडलेल्या पालक मेळाव्यात ‘अभ्यास प्रक्रियेत पालकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संपदा राणे होत्या.

यावेळी सावंत म्हणाले की, “शहरी भागापासून दूर असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्येही विद्यार्थ्यांना यशस्वी करता येते, फक्त पालकांनी त्यांच्या आरोग्य, अभ्यास व संगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विस्थापितांच्या गावांमध्ये असलेल्या शाळांना अनेक अडचणी असूनही, रायवाडा शाळेने वेळोवेळी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

“मुख्याध्यापक रावसाहेब पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रकाश बडे यांनी शाळेच्या यशाची माहिती देताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकत आहेत, तसेच शाळेमध्ये स्वच्छ परिसर, सीसीटीव्ही, डिजिटल फलक, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच आनंदा राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमृत कुरळे, सिंधुताई राणे, तसेच अनेक पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular