Homeसंपादकीयशैक्षणिक क्षेत्रात करियर भाग - 2

शैक्षणिक क्षेत्रात करियर भाग – 2

मागील लेख मध्ये आपण पाहिले 10 वी मध्ये चांगले मार्क मिळालेले असताना त्याच विद्यार्थ्याचे मार्क्स 11 वी 12 वी मध्ये खूप कमी आलेले असतात. याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करू.

1) पहिली ते 10 मध्ये मुले शाळेत इंग्लिश विषय शिकतात , इंग्लिश मध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी पाठांतर पद्धतीवर खूप भर दिलेला असतो, यात मार्क चांगले मिळतात पण इंग्लिश चा कन्सेप्ट CLEAR झालेला नसतो.

10 वी नंतर 11 वी 12 वी मध्ये SCIENCE चा SYLLABUS हा पुर्णपणे ENGLISH मधून असतो आणि इंग्लिश व्यवस्थित समजत नसल्यामुळे शिक्षक शिकवत असताना खूपशा गोष्टी समजत नाहीत. इंग्लिश व्यवस्थित येत नसल्यामुळे CONCEPT CLEAR होत नाहीत .

मी खूपशी मुले अशी पाहिली आहेत ज्यांचे पहिलीपासून 10 वी पर्यन्त खूप चांगले मार्क्स मिळालेले असतात , 10 वी मध्ये तर 90% पेक्षा जास्त मार्क्स असतात पण हीच मुले 11 वी सायन्स मध्ये 55 ते 65 % मार्क मिळवतात.
म्हणजेच ENGLISH चा CONCEPT CLEAR होणे हे खूप महत्वाचे असते.

2) आपण पहिली पासून 10 वी पर्यन्त प्रत्येक ईयत्तेमध्ये 1 वर्ष शिकत असतो अशी 9 वर्ष घेतल्यानंतर विद्यार्थी 10 वी मध्ये येतो पण पाठीमागील वर्षाचा अभ्यास CONCEPT CLEAR नसतील तर मग पुढचे काही समजत नाही.
म्हणजेच प्रत्येक वर्गामधील ,अभ्यास त्याचा CONCEPT CLEAR होणे खूप महत्वाचे असते पण पालक वर्ग व विद्यार्थी फक्त पाठांतरच्या पाठीमागे लागून मुलांना Exam Oriented बनवत असतात.
ज्यावेळी मुलांना 1st पासून चांगले मार्क मिळत असतात त्या वेळी पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढत जातात ,पालक ठरवतात मी माझ्या मुलाला डॉक्टर करीन ,IAS अधिकारी बनवीन मग 12 वी सायन्स मध्ये कमी मार्क मिळाले तर पालकांनी पाहिलेली स्वप्नं ,पूर्ण होऊ शकत नाहीत , विद्यार्थी FRUSTATION मध्ये जातात.आपण पेपर मध्ये बातम्या वाचतो कमी मार्क मिळाल्यामुळे विद्यार्थी घर सोडून गेला,आत्महत्या केली यासगळ्यापाठीमागे असतात पालकांच्या अपेक्षा या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी अशा प्रकारचे निर्णय घेतात. मग एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे प्रकार थांबवू शकतो का ?
हो नक्कीच कसे ते आपण पुढील भागामध्ये पाहू ….

क्रमश :
अजित केळकर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular