अमित गुरव (आजरा ) – कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्रीकल्चर फाउंडेशन उत्तूर् च्या 49 व्या बॅचला सुरुवात झाली. त्यावेळी अमित एमगेकर ( आत्मा अधिकारी , आजरा ) यांनी सध्या नोकरीची शाश्वती नाही आणि याला सुरुवात तर शासनाने केली आहेच . तेव्हा आज पासूनच तुम्ही व्यवसायाकडे वळा असा सल्ला दिला . या कोर्सला आत्मा कडून फंडिंग होते त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू पण तुम्ही व्यवसाय करताना पूर्ण माहिती घेऊन करा असे सांगितले.
रामकृष्ण मगदूम यांनी या उत्तुर सेंटर ला राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट नॅशनल ट्रेनिग इन्स्टिट्यूट पुरस्कार मिळाला असल्याचे नमूद करून त्यांचे श्रेय सचिन पाटील, आणि सुधाकर जोशिलकऱ यांना दिले.
प्रास्ताविक आणि स्वागत सुधाकर जोशिलकर यांनी केले त्यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
मुख्यसंपादक