आरती ज्ञानराजा या आरतीच्या मूळ रचनाकारांची मनस्वी माफी मागून….
आरती ज्ञान घे जा
पोरी शाळेत जा जा
पाहू नकोस अंत,
भेजा सटकेल माझा ।।ध्रु।।
झोपले लोक जगी,
तरी तू जागी शहाणी
चँटींग तुझ्यासंग,
सांग करतंय कोणी..।।१।।
झाली तू नेटकरी
बाप रिचार्ज मारी…
नादच भंगार ह्यो,
पार बरबाद करी…।।२।।
घरात माय बोले,
मज वाटोळे केले..
मोबाईल घेऊनी,
पोर बिघडून ठेविले।।३।।
आरती ज्ञान घे जा
पोरी शाळेत जा जा
पाहू नकोस अंत,
भेजा सटकेल माझा
✍️श्री.विजय शिंदे..
३२शिराळा, सांगली
मुख्यसंपादक
अप्रतिम विडंबन काव्यलेखन सर👍👍👌👌💐💐
मन:पूर्वक आभार सर🙏😊
सुंदर लेखन
अप्रतिम..