भाग ४३
यशासाठी प्रकल्प अंमलबजावणीतील महत्वाच्या गोष्टी :
ध्येयपूर्ती कशी होईल यांचा सांगोपांग विचार
प्रत्येक टप्प्याचे योग्य नियोजन : कोण काय करेल व केव्हा आणि कसे
महत्वाच्या कर्मचारी क्षमता/विशेष कौशल्ये
नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करताना सांगोपांग विचार : पहिल्यांदा नव्याने करणार आहात का? किंवा अंमलात आणण्यापूर्वी काही चाचपणी केली आहे का?
प्रकल्प अंमलबजावणीचे मुल्यांकन कसे करावे?
उद्दिष्टे : प्रकल्पाचे यशाचे मुल्याकन. संस्थेच्या उद्दिष्टांशी निगडीत.
कामाचे मूल्यमापन
मूल्यांकनाचे साधन व मुल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची निवड
प्रकल्पाचा खर्च : प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रत्येक घटकांवर होणारा अपेक्षित खर्च
प्रकल्पाची एकूण अंदाजे रक्कम/ संस्थेचा वाटा/ दात्या व्यक्तीकडून अपेक्षित रक्कम/ अगोदर संस्थेने केलेली मदत.
प्रत्येक खर्चाच्या घटकांचे स्वरूप : वस्तुखरेदी, कर्मचारीवृंदाचा पगार इत्यादी
वस्तुरूपात मिळालेल्या मदतीचा उल्लेख
खर्चाच्या प्रत्येक घटकावर खुलासेवार थोडक्यात तपशील.
प्रकल्प अनुदान विनंती : ही प्रकल्पासाठी असलेले तूट, उर्वरित रक्कम, भरून काढण्यासाठी असते.
प्रकल्पाचे भविष्य : प्रकल्प कालावधी संपल्यानंतरही प्रकल्प चालू राहील काय?
प्रकल्प कालावधी संपल्यानंतरही प्रकल्प अंमलबजावणी कशी चालू राहील.
प्रकल्पाच्या स्थैयासाठी जनसमुदायाचा व इतर प्रमुख घटकांचा सुरवातीपासून समावेश
प्रकल्प कार्यरत रहाण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी : नाममात्र फी आकारणी
प्रकल्पास अंतर्गत मदत
इतर निधी स्त्रोत
न साध्य करता येण्याजोगी आश्वासने देऊ नका.
प्रकल्पाचा सारांश : प्रकल्पाच्या प्रत्येक घटकावर थोडक्यात दृष्टीक्षेप
प्रकल्पाचा थोडक्यात गोषवारा
प्रकल्पासोबत जाणारे पत्र कसे असावे? पत्र वैयक्तिक असावे
साध्या कागदाचा वापर
संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्याची पत्रावर स्वाक्षरी असावी.
दात्या संस्थेच्या प्रमुख व्यक्तीस पत्र अभिप्रेत असावे.
पत्रात महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख असावा. उदा. मदत कशासाठी, काय साध्य करण्यासाठी व आर्थिक मदत किती
आपले नाव, हुद्दा व दूरध्वनी क्रमांकाचा पत्रात उल्लेख असावा.
पत्रासोबत जाणाऱ्या कागदपत्रांची यादी.
प्रकल्प लेखनात प्रामुख्याने दुर्लक्षित होणाऱ्या गोष्टी :
प्रकल्पात खालील गोष्टींचा अभाव : प्रकल्पाचे नियोजन
प्रकल्पाचा कालावधी
प्रकल्पाचे समीक्षण/ अंमलबजावणी
प्रकल्पाचे सिंहावलोकन/ मुल्यांकन
प्रकल्पाचे यश तपासण्यासाठी योग्य अशा मुल्यांकन पद्धतीचा अभाव
कालावधी
किचकट न समजणारे प्रकल्प सादरीकरण.
न साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टे
दात्या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांशी विसंगत
प्रकल्प कालावधी संपल्यानंतरही, प्रकल्प कार्यरत राहील. या संबंधीच्या ठोस पुराव्याचा अभाव
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मुख्यसंपादक