Homeघडामोडीधान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सलग ३ दिवस महाप्रसादाचे आयोजन

धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सलग ३ दिवस महाप्रसादाचे आयोजन

कोल्हापुर – ( प्रतिनिधी ) -: धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले असून गणेशोत्सव काळात शनिवार दि १४, रविवार दि १५ व सोमवार दि १६ या तिन्ही दिवशी सायंकाळी ७:३० च्या आरतीनंतर सलग ३ दिवस सुंगधी इंद्रायणी तांदूळ ,मुगडाळ, तूप यापासून तयार केलेल्या खिचडी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. कोल्हापुर जिल्हा सह दुध उत्पादक संघाचे जेष्ठ सचालक माजी चेअरमन श्री विश्वास पाटील, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री प्रकाश देसाई, उपसभापती सौ सोनाली पाटील, श्री वीरशैव बॅकेचे संचालक श्री अनिल सोलापुरे ,विश्वप्रभा उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री राजेंद्र शेटे, काळभैरव ॲगो इंडस्ट्रीचे श्री प्रकाश मोरे या मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव यांनी केले आहे.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष वैभव लाड सेक्रेटरी राहूल हळदे खजानिस सचिन मिठारी गणेश सन्नकी, विजय कागले, बलराज निकम, सुरेश लिंबेकर सागर सन्नकी, अमित खटावकर, सिद्धार्थ कापसे विशाल कोगनोळे, यश मकोटे, वैभव घोडके, निखिल सावडेंकर, सम्मेद तपकिरे, धमेंद्र नष्टे रितेश हळदे विवेक शेटे संतोष लाड शिवाजी मोटे सुभाष अथणे, धमेंद्र नष्टे, ओंकार पेटकर, आशिष क्षिरसागर, अरविंद जैन, शिरिष साबणे, सुनील नष्टे, यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular