आजरा – ( अमित गुरव) -:पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नागेश यमगर यांनी एक पथक तयार केले होते त्यात पोलिस हवालदार महेश गवळी यांनी आज पोलीस ठाण्याच्या आधी मध्ये गांजा विकणाऱ्या इसमावर आदेशानुसार कारवाई केली होती आणि त्यांच्याकडून 10हजार रुपये किंमतीचा 612 ग्रॅम आमटी पदार्थ ( गांजा ) पकडला होता. हर्षवर्धन उर्फ हर्षद धनाजी लोंढे ( रा. पेरणोली तालुका आजरा ) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते तसेच आरोपीच्या ताब्यातून 75000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक श्री संजय पाटील यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला होता. सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता हा गांजा रोहित उर्फ सोन्या सुरेश कदम वय 31 राहणार पुणे याच्याकडून कधी केला असे सांगितले तर त्याने संपत गणपत शिंदे वय 40 रा. चास ता. आंबेगाव , जि – पुणे यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
आरोपी क्रमांक तीन शिंदे याची कसून चौकशी केली असता सदर गांजा आरोपी क्रमांक चार पोपट उर्फ बबूशा जयराम सालके ( वय 59 रा. जवळा, ता – पारनेर , जि – अहमदनगर याला आमच्या घरातून नमूद गुन्ह्यात अटक केली आतापर्यंत चार आरोपींना अटक केले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत. औसा तालुक्यातील सर्व नागरिकांना गांजा अगर अन्य अमली पदार्थांची विक्री अगर सेवन करताना कोणी आढळून आल्यास याबाबतची माहिती आज या पोलीस स्टेशन येथे देण्यात यावी असे आवाहन आजार पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज निकेश खाटमोडे पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज रामदास इंगवले , सहाय्यक पोलीस निरीक्षक आजरा नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल एस . एस म्हसवेकर , पोलीस हेड कॉन्स्टेबल गवळी , पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत देसाई , पोलीस कॉन्स्टेबल दयानंद बेनके , पोलीस कॉन्स्टेबल महेश चिटणीस , पोलीस कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार , पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे , पोलीस कॉन्स्टेबल खवरे पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव , पोलीस कॉन्स्टेबल विकास कांबळे या पथकाने केलेली आहे .
मुख्यसंपादक