अमित गुरव -: Nota ( None of the above) म्हणजे वरील पैकी काहीही नाही असा त्याचा अर्थ होतो . २००९ साली भारतात आले पहिल्यांदा Nota हा पर्याय मतदारांना दिला. छत्तीसगड राज्यामध्ये सर्वप्रथम स्थानिक निवडणुकीत Nota हा पर्याय दिला . छत्तीसगड , मिझोराम , राजस्थान , आणि मध्य प्रदेश मध्ये २०१३ साली तर २०१४ मध्ये Nota हा पर्याय संपूर्ण भारतात लागू झाला. डिसेंबर २०१३ रोजी इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रात Nota हा पर्याय प्रदान करण्याच्या सूचना भारतीय आयोगाला देण्यात आल्या.
नोटा या पर्यायाला २०१८ रोजी भारतात सर्वप्रथम उमेदवारांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त झाला.२०१९ रोजी भारतात सावत्रिक निवडणुकीत सुमारे १.०४% मतदारांनी नोटा साठी मतदान केले. पण २.०८% रोजी Nota मतदारसंघ बिहार आगदी आघटिवे आहे.
नोटा हा पर्याय प्रदान करण्याची कारणे ?
१) लोकशाही देशात लोकांना उपलब्ध आपल्या आवडीचा उमेदवार निवडून आणण्याचे स्वतंत्र तर होते पण असलेल्या उमेदवारांना नाकारणे साठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नव्हती.
२) राजकीय पक्षाला नोटा या पर्यायातून आम्हाला तुम्ही दिलेला उमेदवार मान्य नसून दुसरा उमेदवार द्यावा , असा संदेश दडपशाही बळी न पडता गुप्त पद्धतीने जनतेने दिलं लोकशाही जिवंत राहिल.
३) नोटा ला मतदान म्हणजे लोक पक्षाच्या उमेदवारांना नाकारून तुम्ही आमच्या श्रेत्रातील / मतदारसंघातील उमेदवार किंवा नेता बदलावा असे संदेश ठेवणे. Nota च्या अडचणी काय येतात ? Nota हा पर्याय फक्त मतदात्याला आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी होतो. त्याचे आकडे इतके पण जास्त नसतात की त्यांना त्यावर विषार करायला भाग पाडतील.
नोटा च्या अधिकारातून काय होऊ शकते ?
नोटा सारख्या राईट टू रिजेक्ट अधिकाराचा उपयोग पोलंड येथे १९८९ रोजी निवडणुकीत करणात आला. सामाजिक आंदोलन आणि सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी लोकांनी याचा आधार घेतला आणि कम्युनिस्ट सरकार पडले होते.
. लिंक मराठी चे आवाहन
तुम्ही सुज्ञ मतदार आहात त्यामुळे मतदान कोणाला करायचे हा सल्ला आम्ही देत नाही पण तुम्ही मतदान जरूर करावे अशी विनंती वजा आवाहन लिंक मराठी मार्फत विनम्र पने करतो.
मुख्यसंपादक