आजरा (हसन तकीलदार ):-मागील दोनवर्षांपासून संकेश्वर बांदा महामार्गाचे काम सुरु होते. आता ते पूर्णत्वास गेले आहे. परंतु या महामार्गावरील रस्त्याशेजारील गटारी योग्यरित्या न बांधल्यामुळे काही ठिकाणी त्रास तर होतच आहे परंतु धनगरमोळा परिसरात गटारीच बांधल्या नसल्यामुळे पावसाचे रस्त्यावरील पाणी घरामध्ये घुसण्याचे प्रकार सुरु आहे. पावसाच्या सुरवातीलाच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण पावसाळा आम्ही झेलायचा कसा असा प्रश्न तेथील रहिवासी करीत आहेत. हा भाग अतिपावसाचा असून याठिकाणी त्वरित गटारी बांधून देण्याची मागणी जोर धरत आहे.
मौजे सुळेरान पैकी धनगरमोळा येथील आनंदा शेटगे यांचे घरापासून ते संजय शेटगे यांचे घरापर्यंत पावसाळ्यातील शेतातून येणारे पावसाचे पाणी गटर नसल्याने रस्त्याच्या शेजारी रहात असलेल्या सर्वांच्या घरामध्ये जात आहे. त्यामुळे घरातील प्रापंजिक साहित्याचे नुकसान तर होतच आहे त्यामुळे घरांची पडझड होऊन जिवीत हानी होण्याचीही शक्यता आहे. येथून ग्रामपंचायतीची पाण्याची पाईप असल्याचे कारण बोलले जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा पाईप खराब किंवा नादुरुस्त झाली तरी काही हरकत नाही पाईपलाईनसाठी येणारा भविष्यातील खर्च ग्रामपंचायत करणेस तयार आहे त्याचप्रमाणे पाईप लाईनची पर्यायी व्यवस्था केलेली असलेबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे 2024 साली कळविले असून धनगरमोळा येथे आनंदा शेटगे ते संजय शेटगे यांचे घरापर्यंत पाहणी करून गटर बांधकाम करणेस सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुळेरान यांनी दि. 9/5/2024 रोजी निवेदन देऊन मागणी केली होती. तरीसुद्धा आजपर्यँत यावर उपाययोजना आखणेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक डोळेझाक करीत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप आणि नाराजी दिसून येत आहे.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक


