आजरा (हसन तकीलदार ):-व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. योगाचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. धावपळीच्या आजच्या युगात नियमित योगा केल्यास जीवन निरोगी बनू शकते. योगाचे महत्व हे अनमोल आहे. हे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर ते मन, शरीर, आणि आत्मा यांना जोडणारे एक प्राचीन शास्त्र आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते व तणाव कमी होते म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा केला जातो. यावर्षीही 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस व्यंकटरावसंकुलात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,दररोज योगा केल्याने माणसाचे जीवन निरोगी ,आनंदी व उत्साही राहून विद्यार्थ्यांना अभ्यासात त्याची निश्चितच मदत होते. मन ,मेंदू व शरीर सदृढ ठेवायचे असेल तर विद्यार्थीदशेपासूनच दररोज योगासन तसेच प्राणायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये योगाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचे महत्त्व जाणून जगातल्या इतर देशांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला आहे.. पण आपल्या देशातील विद्यार्थी व नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागत आहे.. त्यामुळे आज फक्त एक दिवस योगा न करता दररोज नित्यनेमाने प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि योगासनासाठी द्यावा असे त्यांनी सांगितले व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ढोल ताशा यांच्या सहाय्याने योग प्रात्यक्षिक दाखवून त्यांचे कडून करवून घेतले व प्रत्येक योगासनाचे महत्त्व पटवून सांगितले. प्रास्तविक प्रकाश पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे शेलार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचे व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक