Homeवैशिष्ट्येभाग ५८- प्रभावी संवादातील महत्वाचे पैलू / घटक

भाग ५८- प्रभावी संवादातील महत्वाचे पैलू / घटक

“ I Could know everything, If kept Silent So That I could listen” latin poverb
             “ऐकणे” हा प्रभावी संवादातील एक महत्वाचा पैलू आहे.

“ऐकल्याने” आपले क्षितीज विस्तारते काळजीपूर्वक ऐकल्यामुळे आपल्याशी संवाद साधणारी व्यक्ती नेमके काय काय सांगू इच्छित आहे. ह्याचे चांगले आकलन होते. ह्या प्रक्रियेत “ऐकणारा” आपल्या काही प्रतिक्रिया देऊ शकतो जेणे करून संवाद साधणाऱ्याचे चांगले आकलन होते. Active Listening म्हणजे नीट काळजीपूर्वक ऐकणे, विचार करून केलेला (Active Listening)
न ऐकण्याचे विविध प्रकार (Non Listening )
१) चुकीचे ऐकणे-ऐकणारी व्यक्ती आपण ऐकत आहोत असा केवळ आभास निर्माण करते पण प्रत्यक्षात काळजीपूर्वक ऐकत नसते.
२) एकाच पातळीवरील ऐकणे-ऐकणारी व्यक्ती संदेशवहानातील एका/बाजूचे/एकाच बाजुतील संदेश ऐकले व दुसरी बाजू ऐकण्याची टाळाटाळ करणे.
३) ठराविक ऐकणे-काही व्यक्ती आपल्या ताज्या गोष्टीत रस आहे. तेवढेच ऐकतात बाकीचे सर्व सोडून देतात.
४) ठराविक संभाषणावर/संवादावर नकार काही लोक फक्त नकार द्यावयाच्या/ न महत्वाच्या गोष्टी व ऐकू नयेत अशाच गोष्टीच ऐकतात आणि योग्य वेळी आपला नकार/नापसंती दर्शवितात.
५) शब्द ऐकणारा ऐकत असतो आणि म्हणूनच मध्ये बोलण्याची संधी तो/ती घेते.

ऐकण्याच्या ५ स्तर आहेत.
१. चालढकल करणे लक्ष न देणे.
२. आभास निर्माण करणे.
३. निवडक ऐकणे.
४. लक्षपूर्वक ऐकणे (फक्त शब्द)
५. आकलन करून घेऊन ऐकणे (अर्थ समजून)
प्रभावी कार्यक्षम संवाद हा ऐकणाऱ्याला व दुसऱ्या सहकाऱ्याला समजून उमजून पाठवलेल्या व मिळालेल्या संदेशाचे आकलन करतो.
काही वेळेला निरोप/संदेश अर्थवट, अडखळलेला असतो. जो बोलणाऱ्याला समजणे कठीण करतो. काही वेळेस बोलणाऱ्याला नक्की काय बोलायचे व मांडायचे ह्या विषयी स्पष्ट नसते. नीट ऐकणे/काळजी पूर्वक ऐकणे ह्या संकल्पनेतील एक महत्वाचे तत्व म्हणजे संभाषण/संदेश न कळल्यास प्रतिप्रश्न/अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारणे.
काही नाजूक अतिमहत्वाच्या गुंतागुंतीच्या संभाषणात “थेटप्रश्न” विचारण्याचे टाळलेले बरे/ अशावेळेस अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारणे जास्त हितावह.

काळजीपूर्वक ऐकणे/नीट ऐकणे ह्यातून तुम्ही सांगणाऱ्या सूचित करता की
१) तुम्ही सांगणार्‍याचे प्रश्न/समस्या नीट ऐकत आहात.
२) काही विशिष्ट प्रश्नांमुळे/ समस्यांमुळे तुमची भावना काय आहे हे तुम्ही चांगले जाणता.
३) ह्या प्रश्नावली विचार करण्यासाठी/ प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी मी तुम्हांस नक्कीच मदत करेन.
४) माझा तुमच्यावर विश्वास आहे व ह्या प्रश्नावर तुम्ही एकटेच उत्तर शोधण्यास समर्थ आहात हा माझा विश्वास आहे.
माणूस हा खालील तीन मार्गांचा अवलंब करून काळजीपूर्वक ऐकत असतो.
१. संभाषण चालू असता व्यत्यय न आणणे. “का?” “मी सुद्धा” वगैरे वगैरे शब्दांची मांडणी-मला जर तुमचे म्हणणे नीट कळले असते तर/ तुमचे म्हणणे जर ती नीट जाणले असेल तर
२. व्यक्त करत असताना त्याच त्याच शब्दांचा पुनरुच्चार टाळणे पण त्यातला अर्थ/गाभा/गाभितार्थ तेवढाच सांगणे/मांडणे.
उदा. शाळेतला मुलगा त्याने काढलेल्या चित्रावर पाणी पडल्यावर कसे काय व्यक्त करेल. माझ्या बाकावर पाणी टाकले आता तो हसतोय मी पण त्याचे चित्र बिघडविन/खराब करीन ह्यावर शिक्षकांचा प्रतिसाद
“तू तुझ्या मित्रावर रागवल्यास कारण हे काम आता तुला परत करावे लागणार आहे बघू या तुझे चित्र परत कसे होते.

प्रभावी संवादातील महत्वाचे घटक
▶️ Paraphrasing शब्दांची पुनश्च केलेली मांडणी सारांश
▶️ पूर्णग्रह/ ठाम समजून/ चुकीच्या समजुती
▶️ सुसंगत प्रश्न
▶️ प्रतिसाद व टीका
थोडक्यात व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे “सांगणाऱ्याला” आपले म्हणणे “ऐकणाऱ्याला” किती कळले आहे हे जाणून सोपे होते व आपल्या संभाषणात काही त्रुटी व कमतरता राहून गेली आहे का हे कळणे सोपे होते.
Paraphrasing म्हणजे गोषवारा घेणे/सारांश व ऐकलेल्या महत्वाच्या गोष्टीची पुनश्च मांडणी व ऐकलेले सर्व बरोबर आहे. सुसंगत आहे ह्याची खातरजमा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular