Homeबिझनेसभाग ५९- प्रभावी संवादातील महत्वाचे पैलू / घटक

भाग ५९- प्रभावी संवादातील महत्वाचे पैलू / घटक

चुकीच्या समजुती / पूर्वग्रह / ठाम समजूत
माणूस सतत काही ठोस समजुती घेऊन पुढे जात असतो पण दरवेळेस त्याबरोबरच व मात्र असतील असे नाही. आपण एखाद्या प्रती घेतलेला/ठरवलेला निर्णय/मत हा आपल्यापुरताच मर्यादित दिला असतो. कदाचित त्याच माहितीतून काही दुसर्या मतितार्थ/निर्णय निघू शकतो. काही ठोस समजुतीवर आग्रही असताना आपण घेतलेली भूमिका व बोलण्याचा मत प्रवाह/विचार प्रवाह ह्यांची सांगड घालणे आवश्यक ठोस समजुती बाबत आग्रही ठाम असू नका व त्याची “गृहीत” धरून नका त्यासाठी मी तुम्हाला जे “जाणले” आहे ते बरोबर आहे ह्याची खातर जमा करणे इष्ट.

संभाषणात/ संवादाशी संदर्भात/अनुषंगाने विचारले जाणारे सुसंगत प्रश्न
संभाषणात/ संवादाशी संदर्भात/ धरून प्रश्न विचारून संदेशाचे नीट आकलन करणे हा एक साधा सरळ पर्याय आहे. प्रश्न विचारणे केव्हाही चांगले कारण सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याला कुठे अडचण आहे हे न विचारता समजू शकत नाही हे प्रश्न बरेचदा खुले/ मोकळे असतात ह्याचाच अर्थ ह्याची उत्तरे हो/नाहीच्या पेक्षाही वेगळी असू शकतात.
उदा.एखादी मिटिंग ठरवल्यानुसार पार पडली नसल्यास आपले काय चुकले ह्या पेक्षाही मिटिंग जास्त परिणामकारकरित्या होण्यासाठी अजून काय करयला हवे होते. असा सकारात्मक प्रश्न विचारणे जास्त संयुक्तिक :

प्रतिसाद व टीका :
प्रतिसाद म्हणजे सांगणाऱ्याने सांगितल्यानंतर व्यक्त केल्यानंतर ऐकणाऱ्याने व्यक्त केलेली भावना व विचार विचारपूर्वक दिलेल्या प्रतिसाद हा प्रतिप्रश्न मुल्यांकनापेक्षा जास्त वर्णनात्मक असतो व तो थेट प्रश्नाला धरून व्यक्त केलेला असतो.

टीका ;
एखाद्या वर्तनामुळे काही अडचण/ समस्या निर्माण झाल्यामुळे तुम्ही समाधानी आहात व काही “बदलाची गरज” आहे असे वाटून व्यक्त केलेली भावना म्हणजे “टीका”.

टीकेची प्रक्रियेमध्ये :
१. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल/क्रियेबद्दल तुमचे निरीक्षण मांडता.
२. कृती केलेल्या माणसाला त्याचे वर्तन तुम्हांला कसे वाटते हे सांगता.
३. कुठे बदलायची व का बदलायची गरज आहे हे सांगता.
थोडक्यात प्रतिसाद
१. रचनात्मक विधायक असावा-विघातक नसावा.
२. सकारात्मक असावा नकारात्मक विचार/भावना नसावी.
३. पुढे जाऊन सुधारण्यावर जास्त भर देणारी असावा. इतिहासाची पुनरावृत्ती नको.
४. वर्तनाला धरून असावा व्यक्ती व व्यक्तिरेखेला धरून नसावा.
५. कृती व बदल ह्याचेवर भर असावा. नुसता आशावाद व काही न करू शकणारा नसावा.
६. एकतर्फी नसावा., नुसत्या सांगणाऱ्याच्या नव्हे तर ऐकणाऱ्याच्या गरजांचीही विचार व्हावा.
७. सर्व कामात उपयुक्त ठरणारा असावा. काही ढोबळमानाने ठरविलेल्या नसावा.
८. एखाद्या विनंतीचा विचार करून दिलेले निरीक्षण असावे ही “आग्रही नाही” (Assertive Skills) ची भूमिका नसावी.
९. सुसंवाद असावा. विसंवाद नको !!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular